मुंबई : बेली फॅट हे सध्या प्रत्येकाची समस्या बनली आहे. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही आतापर्यंत बऱ्याच पद्धतींचा वापर केला असेल. मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे बेली फॅट वाढतं. बेली फॅट कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स देणार आहोत.
बेली फॅट कमी करण्यासाठी या टीप्स करा फॉलो
जर तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरीजचं प्रमाण कळलं तर मग व्यायाम सुरू करू शकता किंवा काही फिटनेसची प्रोसेस सुरु करू शकता. अशा परिस्थितीत स्वत:साठी असे उपक्रम निवडा, ज्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात जिम किंवा योगाचा पर्याय निवडू शकता.
बेली फॅट कमी करण्यासाठी सर्वात मुख्य म्हणजे कॅलरीजचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा. नाश्त्यामध्ये ओट्स, दुपारच्या जेवणात डाळ आणि रात्रीच्या जेवणात हलका आहार घेतल्याने फायदा होईल.
बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज सुमारे 10 हजार पावलं चालणं. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे आणि तुम्हाला दररोज सुमारे 400 ते 500 कॅलरीज बर्न करण्यात मदत होईल.