पायांमध्ये 'हे' तीन संकेत दिसताच समजून जा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय; दुर्लक्ष केल्यास...

High Cholesterol Symptoms: हाय कोलेस्ट्रॉलमुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकते. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय याचा घेतलेला आढावा 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 2, 2023, 06:14 PM IST
पायांमध्ये 'हे' तीन संकेत दिसताच समजून जा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतंय; दुर्लक्ष केल्यास... title=
three signs in the feet can be signs of increasing high cholesterol

High Cholesterol Symptoms: हाय कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलरही म्हणतात. वाढते कोलेस्ट्रॉल म्हणजे स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्यासह विविध हृदयरोगांना (Heart Attack) आमंत्रण देणे आहे. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असून तो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. त्याचे प्रमाण वाढल्याने रक्तप्रवाह कमी होतो किंवा थांबू शकतो.  जेवणात चरबीयुक्त पदार्थ खाणे, स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, मद्यपान, आजची जीवनशैली, यामुळं कोलेस्ट्रॉल वाढते. पण कोलेस्ट्रॉल वाढत असताना आपलं शरीर संकेत देते असते. पायामध्ये हे तीन बदल दिसताच वेळीच सावध व्हा. (High Cholesterol Symptoms Feet)

शरीरातील कोलेस्ट्रॉलचा पातळी २०० मिलीग्रामपर्यंत प्रति डेसीलिटरने वाढली तर ते धोकादायक ठरू शकते. हाय कोलेस्ट्रॉलचे सुरुवातीची लक्षणे सौम्य असतात. त्यामुळं या लक्षणांकडे सहाजिकच दुर्लक्ष होते. मात्र, हळहळू वाढत जाणारे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक ठरु शकतं. त्यामुळं जेव्हा हाय कोलेस्ट्रॉलबाबत कळतं तेव्हा आधीच उशीर झाला असतो. आधीच लक्ष दिल्यास हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षणे वेळीच ओळखता येतात. त्यामुळं पुढे होणारे नुकसान टाळता येते. 

क्लॉडिकेशन

क्लॉडिकेशनमध्ये रक्त प्रवाह कमी झाल्यामुळं वेदना होतात. हे हाय कोलेस्ट्रॉलचे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. या स्थितीत पायांच्या मासपेशींमध्ये वेदना होतात, पाय मुरगळणे, थकवा जाणवणे असा त्रास होतो. ठराविक अंतरापर्यंत चालल्यानंतर असा त्रास जाणवतो. पण काही काळ आराम केल्यानंतर लगेच बरा देखील होतो. क्लॉडिकेशनमुळं साधारण पणे पाय, मांडी आणि पायाच्या तळव्यांना अधिक त्रास जाणवतो. 

पाय थंड पडणे

पाय थंड पडणे हे हाय कोलेस्ट्रॉलचे आणखी एक लक्षण आहे. अधिक तापमान असतानाही तुमचे पाय थंड पडत असतील किंवा पायात कंपन जाणवत असतील तर हे पेरिफेरल आर्टरी डिसीसचे मुख्य लक्षण असू शकते. सुरुवातीला तुम्हाला याचा अधिक त्रास जाणवणार नाही मात्र सतत हा त्रास होत असेल किंवा घरगुती उपाय करुनही थांबत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

पायाच्या त्वचेचा रंग बदलणे

हाय कोलेस्ट्रॉलमुळं रक्त वाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळं रक्तप्रवाहावर परिणाम होतो. जेव्हा एखाद्या भागात रक्ताची कमतरता निर्माण होते तेव्हा शरिराच्या त्या भागातील त्वचेवर परिणाम होतो. अशावेळी तुमच्या पायाच्या त्वचेचा रंग बदलला असेल किंवा तुम्हाला काही बदल जाणवत असेल तर वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.