Sunburn घालवायचाय? 'हे' उपाय करून मिळवा Skin Tanning पासून सुटका

समुद्रकिनारी उन्हाच्या वेळी वेळ घालवल्यानंतरही त्वचेवर सनबर्न झालेला दिसतो.   

Updated: May 26, 2022, 01:14 PM IST
Sunburn घालवायचाय? 'हे' उपाय करून मिळवा Skin Tanning पासून सुटका  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : उन्हाळ्यामध्ये म्हणा, किंवा साधं उन्हाच्या वेळांमध्ये फिरल्यामुळे म्हणा. त्वचा काळवंडते आणि मग नकळतच आपण या गोष्टीचाही ताण घेतो. शरीराचे जे भात कपड्यांनी झाकलेले नसतात तेच उन्हामुळं काळवंडतात आणि दिसायला हे मुळीच चांगलंही दिसत नाही. 

शुभ्रवर्णीयांची त्वचा उन्हाच्या माऱ्यामुळं लाल होते तर, गहूवर्णीयांची त्वचा काळवंडलेली दिसते. काहींना यामुळं त्वचेवर खाज येण्याच्याही समस्या उदभवतात. फक्त उन्हात फिरल्यमुळेच नव्हे, तर समुद्रकिनारी उन्हाच्या वेळी वेळ घालवल्यानंतरही त्वचेवर सनबर्न झालेला दिसतो. (Tips to remove skin tann sunburn marks home remedies )

हा सनबर्न काही दीर्घकाळ टीकणारा नसतो. पण, तो लवकरात लवकर कसा मिटवावा यासाठीचे प्रयत्न मात्र अविरतपणे सुरु असतात. ही क्रीम, ते लोशन आणि बरंच काही. पण, काही सोप्या उपायांनीसुद्धा सनबर्नची समस्या दूर करता येऊ शकते. 

तुमच्याकडे बाथटब असल्याच काही वेळ शरीर पाण्यात बुडवा. अशामुळे समबर्नचे परिणाम कमी होतात. टबमधील पाण्यात ओटमील एका कापडात गुंडाळून ठेवा, यामुळं त्वचा उजळेल. 

ज्या भागात त्वचा काळवंडली आहे तिथे  (Aloe Vera) कोरफड चोळल्यामुळेही बराचट फरक पडतो. किंवा दूध, मधासोबत ओटमील एकजीव करत हे मिश्रण काळवंडलेल्या चेहऱ्यावर लावल्यासही आराम मिळतो. 

स्किन टॅन असणाऱ्या भागावर बर्फ चोळल्यास किंवा आईस बॅगचा वापर केल्यास फार परिणाम दिसून येतील. आईसबॅग नसल्यास सुती कापडात बर्फ ठेवून त्याचाही वापर तुम्ही करु शकता. 

त्वचेसाठी (Coconut Oil) नारळाचं / खोबरेल तेल बरंच फायद्याचं ठरतं. त्यामुळे सनबर्नमुळ काळवंडलेल्या त्वचेवर खोबरेल तेलानं मसाज करण्याचेही बरेच फायदे तुम्हाला दिसतील. 

(Disclaimer: वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)