जिने चढ-उतार केल्यानंतर लगेच धाप लागते? 'हे' सुपरफुड देतील दिवसभराची उर्जा

Stamina Booster Foods: व्यायम केल्यानंतर किंवा थोडे जिने चढ उतार केल्यानंतर लगेच थकवा जाणवतो. आत्ताच आहारात समावेश करा हे सुपरफुड 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 14, 2024, 06:08 PM IST
जिने चढ-उतार केल्यानंतर लगेच धाप लागते? 'हे' सुपरफुड देतील दिवसभराची उर्जा title=
top best foods to increase stamina and energy

Stamina Booster Foods: आजच्या धावपळीच्या युगात आणि धकाधकीच्या जीवनात पुरेसा आराम करण्यासआठी आणि पौष्टिक जेवण करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण ऑफिसच्या कामाचा ताण आणि प्रवास यासाठी स्वतःला उर्जावान ठेवणे खूप गरजेचे आहे. एनर्जी ड्रिंक्स आणि निरनिराळ्या प्रकारचे सप्लींमेंट हे काही वेळासाठीच शरीराला ताकद पुरवतात. मात्र शरीराला उर्जा आणि ताकद मिळवण्यासाठी नैसर्गिक आहारच खूप गरजेचा आहे. आपल्या आयुर्वैदातही अनेक पौष्टिक आहारांबाबत लिहून ठेवलं आहे. जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत जे तुम्हाला दिवसभराची उर्जा देतात. 

ओट्स 

कार्बोहायड्रेट्सने युक्त असलेले ओट्स शरीराला ताकद पुरवतात. ज्यामुळं दीर्घकाळापर्यंत तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्हाला स्वतःलाही दिवसभराची उर्जा मिळाल्यासारखे वाटेल. ओट्समध्ये फायबरची मात्र भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळं पाचनक्रिया सुधारते आणि स्टॅमिना टिकवून ठेवण्यास मदत करते. 

क्विनोआ

क्विनोआ हा एक संपूर्ण प्रोटीन आहार मानला जातो. यात सर्व प्रकारचे आवश्यक असे अमीनो अॅसिड असते. ज्यामुळं स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणत्याही डाएटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यात आढळणारे हाय प्रोटीन स्नायूंच्या ऊतींना दुरुस्त करण्यास मदत करते आणि दीर्घकालीन व्यायाम जसे की सायकलिंग किंवा हायकिंगसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते.

केळं

पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिनने युक्त असलेल्या केळे व्यायम करताना गमावलेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा परत आणतात. त्यामुळं वर्कआउटच्या आधी आणि नंतर केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ तुम्ही ओटमीलमध्ये टाकून खाऊ शकता किंवा त्याची स्मूदी बनवून पिऊ शकता. शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी केळ खूप फायदेशीर आहेत. 

पालक

पालक हा एक न्यूट्रिएंट्स पॉवरहाऊस आहे. आयर्नने युक्त असलेला पालक संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावते. खासकरुन, हार्ड वर्कआउटनंतर पालकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या मदतीने स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. 

चिया सिड्स 

ओमेगा-3 फॅटी अॅसिडची भरपुर मात्रा चिया सिड्समध्ये असते. यामुळं हृदयाचे आरोग्य तर वाढतेच पण स्टॅमिना वाढण्यासही मदत होते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड सूज कमी करण्यासही मदत करते. ज्यामुळं व्यायम करताना मांसपेशियांना बळ मिळते. चिया सिड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट असतात. अशातच जर आपण याचे नियमित सेवन केले तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)