तांदळाच्या पाण्यात मिसळून बनवा हा फेसपॅक, चेहऱ्यावर लगेच चमक आणि तेज दिसून येईल

 घरच्या घरी पैसेही  न घालवता तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता यासाठी उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेस पॅक. 

Updated: Jul 24, 2022, 06:48 PM IST
तांदळाच्या पाण्यात मिसळून बनवा हा फेसपॅक, चेहऱ्यावर लगेच चमक आणि तेज दिसून येईल title=

Beauty tips : प्रत्येकला सुंदर दिसायचं असत गलोईंग स्किन,नितळ त्वचा कोणाला नको असेल,अशी सुंदर स्कीन मिळवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो,वेगवेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करत असतो...पार्लरमध्ये महागडे ट्रीटमेंट्स घेत असतो ,बऱ्याचदा पार्लरमध्ये ट्रीटमेंटसाठी आपल्याला  खिसा रिकामा करावा लागतो. पावसाळ्यात ह्यमिडिटी वाढते. अशा परिस्थितीत त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. या समस्यांमुळे रंग निखळू लागतो. त्याच वेळी, काही लोकांना पिगमेंटेशनची समस्या होऊ शकते. हे दूर करण्यासाठी महिलां पार्लरमध्ये महागडी क्लीनअप किंवा फेशियल करून घेतात.

पण घरच्या घरी पैसेही  न घालवता तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता यासाठी उत्तम उपाय म्हणजे घरगुती फेस पॅक. कोरियन स्किन केअर विषयी बऱ्याचदा वाचतोय, ऐकतो.कोरियन स्किन केअर मध्ये तांदळाचा प्रामुख्याने वापर केला जातो 
तांदळाचं पाणी तांदळाची क्रीम बनवून स्किन प्रॉडक्ट्स मध्ये वापरली जाते चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अफलातून स्किन टिप्स विषयी .हा आहे तांदळापासून बनवलेला अप्रतिम फेस पॅकज्याच्या मदतीने तुम्ही फेसवर चमक मिळवू शकता.

हा फेस पॅक बनवण्यासाठी काय आवश्यक आहे

- मुलतानी माती
- लाल मसूर
- तांदळाचं पाणी
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल

कसे बनवावे

हे करण्यासाठी, आपण प्रथम तांदूळ किमान 1 ते 2 तास भिजवा. तांदूळ भिजत असताना मसूर डाळीची पावडर तयार करा. यासाठी सर्वात लहान ग्राइंडरमध्ये डाळ पिसून घ्या.आता हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात मुलतानी माती, लाल मसूर पावडर आणि व्हिटॅमिन ई मिक्स करा. नंतर भिजवलेले तांदूळ गाळून त्याचे पाणी पॅकमध्ये घाला. चांगले मिसळा. फेस पॅक तयार आहे.

कसे अप्लाय कराल

चेहरा स्वच्छ करा आणि नंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर समान रीतीने लावा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. जरी पॅकमध्ये असलेल्या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत, परंतु तरीही आपण ते लागू करण्यापूर्वी पॅच चाचणी करणे आवश्यक आहे.