मी इको फ्रेंडली सॅनेटरी नॅपकीन वापरते : दीया मिर्जा

सॅनिटरी नॅपकीनच्या जाहीराती करायला दीया देते नकार

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 9, 2017, 11:12 AM IST
मी इको फ्रेंडली सॅनेटरी नॅपकीन वापरते : दीया मिर्जा title=

मुंबई : मासिक पाळी हा आपल्याकडे अनेक समज-गैरसमजांनी भरलेला विषय. त्यात या विषयाबाबत जाहीरपणे बोलायचे म्हणजे तर, अनेकांसाठी आश्चर्यच. पण, अलिकडे ही वीण हळूहळू सैल होताना दिसते आहे. अगदी सेलिब्रेटी मंडळीही याबबत जाहीरपणे बोलू लागले आहेत. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना दूत आणि बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जानेही नुकतेच याबाबत मत व्यक्त केले. तिच्या या मताची सध्या बरीच चर्चा होते आहे.

काय म्हणाली दीया मिर्जा?

दीया मिर्जाने पर्यावरणाबाबत नेहमी आग्रही भूमिका घेतली आहे. अगदी करिअरच्या सुरूवातीला जेव्हा ती बॉलिवूडमध्ये नवखी होते. तेव्हाही तिने पर्यावरण रक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतलेली असायची. नुकतीच तिने नवभारत डॉट कॉमला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक मतं व्यक्त केली आहेत. दीया मिर्जाने पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरत म्हटले आहे की, मी त्या वस्तू वापरने केव्हाच बंद केले आहे. ज्या पर्यावरणाला धोका पोहोचवतात. अगदी सॅनिटरी नॅपकीनसुद्धा. दीया सांगते की, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सॅनिटरी नॅपकीन पर्यावरणाला प्रचंड प्रमाणात प्रदूषित करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सॅनिटरी नॅपकीनचा वापर मी बंद केला आहे. तसेच, मी इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकीन वापरते.

सॅनिटरी नॅपकीनच्या जाहीराती करायला दीया देते नकार

पुढे बोलताना दीया मिर्जा म्हणते की, आमच्या देशात स्त्रीयांच्या आरोग्य रक्षणासाठी उपलब्ध असलेले सॅनेटरी नॅपकीन आणि डायपर मोठ्या प्रमाणात पर्यावरणास हानी पोहोचवतात. तसेच, वातावरणही दूषीत करतात. यामुळे मी मासिक पाळीच्या काळात सॅनेटरी नॅपकीन वापरने बंद केले आहे. एक अभिनेत्री म्हणून माझे हे म्हणने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण, आम्ही सॅनेटरी नॅपकीनची जाहिरातही करतो. मला जेव्हा केव्हा सॅनिटरी नॅपकीनची जाहिरात करण्याची ऑफर येते तेव्हा मी त्यास थेट नकार देते.

सॅनिटरी नॅपकीनऐवजी दीया वापरते हा पर्याय...

दीयाने सांगितले की, ती सॅनिटरी नॅपकीनऐवजी 100 टक्के विघटन होणारे (नष्ट होणारे) बायडिग्रेडबल नॅपकीनचा वापर करने सुरू केले आहे. पूर्वीच्या काळात आपल्या देशातील महिला मासिक पाळीच्या काळात कॉटनचा वापर करत असायच्या. पण, कालांतराने परिस्थितीत बदलली. अशा काळात वापरण्याच्या वेगवेगळ्या वस्तू आल्या. अलिकडील काळात तर, इतकी प्रगती झाली आहे की, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, अशी नॅपकीन उपलब्ध होऊ लागली आहेत. दरम्यान, दीयाने बायोडिग्रेडबल नॅपकीन वापरण्याचे अवाहन सर्व महिलांना केले.