Trending news : आपल्या देशातील सर्वात्तम रुग्णालय म्हणून ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चं नाव घेतलं जातं. इथे डॉक्टर रुग्णांसाठी देव मानले जातात. एम्सच्या डॉक्टरांना पुन्हा एक चमत्कार करुन दाखवला आहे. हरियाणातील एक महिलेला मातृत्वाचं सुख दिलंय. या महिलेचे सात बाळांचा गर्भात मृत्यू झाला. आता ती महिला आठव्यांदा आई होण्याच्या उंबरठ्यावर होती. पण पुन्हा एकदा तो भयान प्रसंग तिच्यावर ओढावला. हे बाळही गर्भात मरणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पण एम्सचे डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून आज हे बाळ आईच्या कुशीत शांत निजल आहे.
हरियाणातील एका गावातील गरीब महिला एम्समध्ये आली तेव्हा तिची सात मुले गर्भातच दगावली होती. गावाच्या आजूबाजूच्या डझनभर डॉक्टरांनी तिला तू आई होऊ शकतं नाही असं सांगितलं. लग्नाच्या पाच वर्षांनंतर तिने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला खरा पण पुन्हाच आई होण्याच स्वप्न धुसर होत होतं. कारण तिच्या शरीरात तयार होणार अँटीबॉडीज तिच्या पोटातल्या मुलाचा नाश करत होतं.
एम्सच्या स्त्रीरोग आणि ओबीएस विभागाच्या एचओडी डॉ. नीना मल्होत्रा यांनी सांगितलं की, त्या महिलेची हिस्टरी पाहिल्यानंतर तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या. या रक्तगटाचे निदान करणे अत्यंत गंभीर असले तरी एम्सच्या रक्तविज्ञान विभागाने केवळ रक्तच नव्हे तर जनुकांचीही तपासणी केली. या महिलेचा आरएच निगेटिव्ह रक्तगट असल्याच समोर आलं. जे बाळापर्यंत पोहोच नव्हते. या महिलेमध्ये अँटीबॉडीज होत्या ज्यामुळे या बाळाचाही नाश होत होता. अशा परिस्थितीत या बाळाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे रक्त आईच्या पोटातील बाळाला दिलं जाईल.
डॉ. नीना म्हणतात की आरएच निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळांपैकी दुर्मिळ असून एक लाख लोकांपैकी फक्त एकामध्ये तो असतो. अशा परिस्थितीत बाळाला वाचवण्यासाठी या रक्ताचा भारतातील सर्व मोठमोठे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांमध्ये शोध घेण्यात आला. मात्र त्यांना अपयश आलं. इंटरनॅशनल रेअर ब्लड पॅनेलमध्ये एका भारतीय व्यक्तीकडे हा रक्तगट असल्याचे समजलं. पण त्या व्यक्तीने रक्तदान करण्यास नकार दिला. यानंतर या दुर्मिळ रक्ताची मागणी आंतरराष्ट्रीय रक्त नोंदणीपुढे केली. चमत्कार म्हणावं की अजून काही जपानच्या रेडक्रॉस सोसायटीने हे रक्त उपलब्ध असल्याच समजलं.
आता हे रक्त भारतात आणायचं होतं. रक्ताचे 4 युनिट जपानहून भारतात पाठवण्यात आलं आणि यासाठी 48 तास लागला. त्यानंतर महिलेतील गर्भातील बाळाला हे रक्त चढवण्यात आले. मग त्या महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यानंतर त्या महिलेने एका सुदृढ मुलीचा जन्म झाला.