डोकेदुखी, अशक्तपणा आणि तोंड येतंय तर समजून घ्या या जीवनसत्त्वाची आहे कमतरता

Vitamin Deficiency शरीरात व्हिटामिनची कमतरता झाल्यास अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या काय आहेत त्याची लक्षणे.

Updated: Mar 21, 2022, 05:18 PM IST
डोकेदुखी, अशक्तपणा आणि तोंड येतंय तर समजून घ्या या जीवनसत्त्वाची आहे कमतरता title=

Vitamin B12 Deficiency : शरीरात जीवनसत्त्वे कमी झाले की, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शरीर याबाबत सिग्नल देत असतं. सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा मायग्रेनचा झटका येत असेल तर असे होऊ शकते की तुमच्या शरीरात एखाद्या विशिष्ट जीवनसत्वाची कमतरता आहे. आळस-थकवा सोबतच जिभेवर फोड येऊ लागले तर हे व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असल्यामुळे होऊ शकते.

Vitamin B12 च्या कमतरतेची इतर अनेक लक्षणे आहेत जसे की थकवा येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखी, तोंड येणे. कधीकधी त्याची कमतरता नैराश्याचे कारण बनते. Vitamin B च्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या अत्याधिक कमतरतेमुळे, झपाट्याने वजन कमी होणे, बद्धकोष्ठता आणि अॅनिमियाचे बळी देखील ठरु शकता. हात-पायांमध्ये मुंग्या येणे हे देखील कारण आहे.

व्हिटॅमिन बी 12 आपल्याला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते, तसेच अनेक विकारांवर मात करण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी 12 रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि त्यावर उपचार कसे केले जातात ते जाणून घेऊया.
द्वारे शिफारस केली आहे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे

त्वचा पिवळसर होणे
जिभेवर पुरळ येणे किंवा लालसर होणे
तोंडाच्या अल्सरची समस्या
दृष्टी कमी होणे
नैराश्य, अशक्तपणा आणि सुस्ती
धाप लागणे
डोकेदुखी किंवा मायग्रेन
भूक न लागणे

दुग्ध उत्पादने

जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता नैसर्गिक स्त्रोतांद्वारे पूर्ण करायची असेल तर दुग्धजन्य पदार्थ हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या आहारात लो फॅट दूध, दही, ताक आणि पनीर यांचा समावेश करू शकता.

आंबट फळे

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी संत्री, मोसमी आणि अननस यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामुळे थकवा आणि मानसिक समस्या दूर होतात. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.

ब्रोकोली

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये Vitamin B12 सोबत फोलेट असते, जे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता टाळते.

अंडी

बहुतेक लोक नाश्त्यात अंडी खातात. हे व्हिटॅमिन बी 12 चा देखील चांगला स्रोत आहे. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्यास जीवनसत्त्वांची कमतरता भरुन निघते. यामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

सोया उत्पादने

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोया उत्पादने खूप फायदेशीर आहेत, म्हणून तुम्ही तुमच्या आहारात सोया दूध, सोयाबीन किंवा टोफू समाविष्ट करू शकता. त्यामुळे शरीराला ताकद मिळेल.

दही खा

जेवणात दह्याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता पूर्ण होते. कमी चरबीयुक्त दही केवळ व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता पूर्ण करत नाही, तर पचन देखील सुधारते.

ओट्स खा

ओट्स शरीरातील व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता तर पूर्ण करतेच पण वजनही नियंत्रित ठेवतात. फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध ओट्स तुम्हाला निरोगी ठेवतील.

(अस्वीकरण: या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. यापैकी कोणत्याही सल्ल्याचा अवलंब करण्याचा किंवा कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया तज्ञाचा सल्ला घ्या.)