काही माणसं कधीही करु शकतात विश्वासघात; 'या' पाच संकेतांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष

Signs of Betrayal:  विश्वासघात... एक असा टप्पा जिथं भल्याभल्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. अनेकदा जवळच्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं हा वार जिव्हारी लागतो.   

सायली पाटील | Updated: Jan 1, 2025, 03:26 PM IST
काही माणसं कधीही करु शकतात विश्वासघात; 'या' पाच संकेतांकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष  title=
new year how to find Some people can betray you observe these 5 signs and be alert

Signs of Betrayal:  आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येक वळणवाटेवर काही माणसं भेटतात आणि ही माणसं बऱ्याचदा इतकी जवळची होतात की सुखदु:खात त्यांची साथ अतिशय महत्त्वाची किंवा त्याहून अतिशय आधाराची वाटते. बऱ्याचदा विश्वासार्ह मंडळींची वागणूक बदलते, काही कारणास्तव त्यांचे विचारही बदलता आणि इथं येतं विश्वासघाताचं वादळ. 

कळत नकळत काही मंडळी विश्वासघात करण्याचं पाऊल उचलतात आणि त्यांच्या या एका निर्णयाचा अनेकांच्याच जीवनावर परिणाम होतो. काही माणसं कधीही विश्वासघात करू शकतात. पण, डोळ्यांवर चांगुलपणाची पट्टी असल्यानं अनेकदा हे हेरताच येत नाही. जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र बराच उशीर झालेला असतो. अशा वेळी माणसांची पारख असण्याचा गुण बरीच मदत करून जातो. पण, मुळात माणसं पारखायची कशी हासुद्धा एक प्रश्नच. 

अनेकदा काही व्यक्ती आपल्यापासून दुरावत आहेत, किंवा आपल्याप्रती त्यांच्या मनात आपुलकीचा भाव नाही हे काही संकेत सांगून जातात. ही मंडळी अमुक एका व्यक्तीचा विश्वासघात करणार हेसुद्धा लक्षात येतं. पाहा काय आहेत ही लक्षणं... 

  • शब्द न पाळणं- जी मंडळी दिलेला शब्द पाळत नाहीत ती कधीच विश्वासार्ह नसतात. ही मंडळी कोणाप्रतीच बांधील राहत नाही असं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं त्यांच्यापासून सावध रहावं. 
  • तथ्यहीन बोलणं- विश्वासघात करणारी माणसं अनेकदा काहीरी तथ्यहीन बरळतात. त्यांच्या वक्तव्यांना काहीही अर्थ नसतो. एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीतून ही बाब लक्षात येते. 
  • खोटं बोलणं- सतत खोटं बोलणं हा विश्वासघाताचाच एक टप्पा. एखादी व्यक्ती सतत खोटं बोलत असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन विश्वासघात करणार ही बाब नाकारता येत नाही. 
  • स्वार्थ साधणं- सतत स्वत:चाच विचार करणं, इतरांची फिकीर न करणं हासुद्धा विश्वासघाताचाच एक प्रकार. ही मंडळी स्वार्थासाठी इतरांचा वापर करून घेतात. 
  • इतरांची निंदा करणं - काही मंडळी सतत इतरांची निंदा करत असतात. दुसऱ्यांच्या उणिवा काढत असतात. सतत इतरांविषयी अती निंदा किंवा अतिशय गोड बोलणाऱ्या व्यक्ती गरज पडल्यास विश्वासघात करू शकतात किंवा ज्याच्याविषयी चांगलं बोलल्या त्याच्याच विषयी वाईटही बोलू शकतात.

हेसुद्धा वाचा : जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण? 

वरील कोणतंही लक्षण आढळल्यास ती व्यक्ती तुमचा विश्वासघात करेलच असं नाही. पण, हे इशारे दुर्लक्षित ठेवणं महागात पडू शकतं. त्यामुळं माणसांची पारख असणं आणि आपल्या हिताचा खरंच कोण किती विचार करतं याचं निरीक्षण करणं हासुद्धा गुण मानवी स्वभावाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा ठरतो. 

(वरील माहिती सामान्य निरीक्षणाच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)