मुंबई : कोरोना व्हायरसपासून स्वतःसाठी रोखण्यासाठी मास्क अत्यंत गरजेचा आहे. WHO कडून अनेकदा सांगण्यात आलं की कोरोनापासून बचवा करण्यासाठी मास्क घालणं गरजेचं आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. मात्र गरजेच असल्यास मास्क महत्वाचा आहे.
पण एक मास्क किती वेळा घालायचा? याबाबत अद्यापही लोकांमध्ये संभ्रम निर्माण आहे. किंवा मास्क घालण्याची योग्य पद्धत काय? हा प्रश्न देखील सामान्यांना पडला आहे.
कोविड-१९ रोखण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. एकच मास्क आणि अस्वच्छ मास्क जास्त वेळ घातल्याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. मास्कमुळे कोरोना टाळण्याऐवजी इतर आजार होऊ शकतात, असे होऊ नये. अस्वच्छ मास्कमुळे तुम्हाला घसा खवखवणे, पोटाशी संबंधित समस्या आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात.
हे जाणून घ्या की जर मास्क अस्वच्छ असेल तर त्याचे छिद्रदेखील अस्वच्छ होतात. अशा परिस्थितीत मास्कमुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मास्क परिधान करताना तुमचा गुदमरल्यासारखे होऊ शकते.
जर तुम्ही कपड्यांचे मास्क घालत असाल तर हा मास्क जास्तीत जास्त तीन महिने घालू शकता. मात्र त्यानंतर मास्क बदलणे गरजेचे आहे.
त्याच वेळी, डिस्पोजेबल N95 मास्क दर दोन महिन्यांनी बदलले पाहिजेत.
जर तुम्ही सर्जिकल थ्री लेयर मास्क घातलात तर तुम्ही हा मास्क तीन ते चार तासांत बदलू शकता.
याशिवाय पुन्हा वापरता येणारा मास्क दोन महिन्यांनी बदलावा.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की मास्क फक्त पाण्याने धुतल्यानंतर पुन्हा घालणे योग्य नाही. मास्क स्वच्छ करण्यासाठी, प्रथम कोमट पाण्यात 10 मिनिटे बुडवा. नंतर मास्क साबणाने स्वच्छ करा. यानंतर, मास्क काही तास कडक सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी ठेवा. जेव्हा मास्क सुकतो तेव्हा तो घरात अशा ठिकाणी ठेवा जेथे तुम्ही तुमच्या हाताला पुन्हा पुन्हा स्पर्श करणार नाही. मास्क घालण्यापूर्वी मास्क सॅनिटाईज केल्याची खात्री करा.