Belly fat घटवण्यासाठी कमी खर्चिक आणि सोपी पद्धत जाणून घ्या!

आज आम्ही तुम्हाला एकदम साधा, सोपा आणि कमी खर्चिक उपाय सांगणार आहोत. लठ्ठपणामुळे (Obesity) अनेक गंभीर समस्या बळावतात, त्यामुळे हा उपाय तुम्ही करू बघाच.

Updated: Nov 7, 2022, 07:04 PM IST
Belly fat घटवण्यासाठी कमी खर्चिक आणि सोपी पद्धत जाणून घ्या! title=

How To Burn Belly Fat: वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी किंवा फॅट बर्न (Fat burn) करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत बरीच मेहनत घेतली असेल. यामध्ये स्ट्रिक्ट डाएट, हेवी वर्कआउट तसंच घरगुती उपायांचा देखील समावेश असेल. मात्र इतके सगळे पर्याय निवडूनही वजन कमी झालं नसेल तर आज आम्ही तुम्हाला एकदम साधा, सोपा आणि कमी खर्चिक उपाय सांगणार आहोत. लठ्ठपणामुळे (Obesity) अनेक गंभीर समस्या बळावतात, त्यामुळे हा उपाय तुम्ही करू बघाच.

पाणी पिऊन घटवा वजन

तुम्हाला कदाचित माहिती नसेल मात्र तुमचं वाढलेलं वजन पाणी कमी करू शकतं. आपल्या शरीरात अधिकतर प्रमाणात पाणी असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने दिवसात 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तर तुम्ही खास पद्धतीने पाणी पिणार असाल तर वजन घटण्यास मदत होईल.

गरम पाण्याने होईल वजन कमी

आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकाळच्या वेळेस गरम पाणी प्यायलं पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे, पाणी पिऊन तुमचं वजन धीम्या गतीने कमी होईल. एक्सरसाईज केल्यानंतर असं करणं टाळावं.

पोटाचा घेर होईल कमी

पोटाची चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करायचं असेल तर तुम्हाला तेलकट पदार्थांपासून दूर रहावं लागेल. त्याचसोबत जर तुम्ही नियमितपणे तुम्ही पाणी पित असाल तर पोटाची चरबी घटण्यास मदत होईल.

भूक कमी होते

गरम पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे असं पाणी प्यायल्याने हंगर क्रेविंग कमी होऊ लागते. परिणामी तुम्हाला भूक कमी लागली की तुम्ही कमी प्रमाणात खाता. यामुळे तुमचं वजन हळूहळू कमी होऊ लागतं.