मुंबई : बाजारात हंगामाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे उपलब्ध असतात. तसे पाहाता सगळीच फळं हे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर असतात. परंतु त्यांपैकी एक चवदार आणि गोड फळ म्हणजे खरबुज. इतर फळांप्रमाणे याचे खूपच आरोग्यदायी फायदे आहेत. जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसतात. चला तर खरबुजचे शरीरासाठी काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ या.
पौष्टिकतेने समृद्ध खरबुज खाल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतात. कॅनटालूपमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे तुमच्या शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ फारच चांगलं आहे.
दुसरीकडे, खरबूजमध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, तसेच ते फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात खरबूजबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थीत राहातात. त्यांपैकी एक म्हणजे वजन वाढणे. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, खरबूज खाल्याने वजन वाढतं. पण हे कितपत खरं आहे, चला जाणून घेऊ.
पौष्टिक-समृद्ध खरबूज हे उन्हाळ्यातील सुपरफूड आहे. हे उष्णतेवर मात करण्यास तसेच आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. आपण सर्वांनी उन्हाळ्यात या स्वादिष्ट फळाचा आनंद घेतला पाहिजे. परंतु खरबूज खाल्ल्याने वजन वाढतं किंवा नाही, यावर एकच सांगण्यात येते की, कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे कधीही चांगले नाही. खरबूजमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे सहसा वजन वाढत नाही, परंतु जर खरबूज जास्त प्रमाणात खाल्ले तर नक्कीच वजन वाढू शकते.
-खरबूज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, ताप आणि इतर व्हायरल इन्फेक्शनच्या कचाट्यात सापडत नाही. खरबुजामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
-खरबूज खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते, यासोबतच डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)