वजन कमी करण्यासाठी गहू की भात, काय खावं? कशामध्ये आहे सर्वाधिक पोषकतत्त्व

Grain for Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो, वजन कमी करण्यासाठी गहू की तांदूळ? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर पुढील बातमी नक्की वाचा.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 13, 2024, 05:53 PM IST
वजन कमी करण्यासाठी गहू की भात, काय खावं? कशामध्ये आहे सर्वाधिक पोषकतत्त्व  title=

वाढलेले वजन अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनते. जर तुम्हीही तुमच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून थकला असाल तर पुढील लेख संपूर्ण वाचा. वजन कमी करण्याच्या प्रवासात गुंतलेल्या लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, आपण गहू खावे की तांदूळ? तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तुम्ही आमचा लेख वाचा. आरोग्यासाठी कोणता पदार्थ चांगला आहे हे समजून घ्या.

गहू किंवा तांदूळ

गहू आणि तांदूळ यामधील कोणत्या पदार्थामुळे वजन कमी होते. तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो की, तांदळाऐवजी गहू खा. याचे कारण म्हणजे गव्हात स्टार्चचे प्रमाण कमी असते. परंतु जर आपण तज्ज्ञांबद्दल बोललो तर तांदूळ आणि गहू दोन्हीमध्ये स्टार्चचे प्रमाण समान आहे. यात थोडाफार फरक असला तरी हा फरक इतका नाही की या बाबतीत दुसऱ्याला पहिल्यापेक्षा चांगले घोषित करता येईल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तांदूळ आणि गहू दोन्ही महत्त्वाचे आहे. 

तांदूळ आणि गहूमध्ये पोषक

'नॅशनल न्यूट्रिशन एजन्सी'नुसार, 100 ग्रॅम तांदळात 350 कॅलरीज आणि 100 ग्रॅम गव्हामध्ये 347 कॅलरीज असतात. तर तांदळात 6% पर्यंत प्रथिने असू शकतात आणि गव्हामध्ये 12% पर्यंत प्रथिने असू शकतात. याशिवाय, त्यांच्या मते, गहू आणि तांदूळ दोन्हीमध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते.

फायबरचे प्रमाण

जे लोक वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी गहू तांदळापेक्षा चांगला असल्याचे म्हटले जाते कारण तांदळात फायबरचे प्रमाण गव्हाच्या तुलनेत कमी असते. याचे कारण असे आहे की भात खाण्यापूर्वी त्याला एका प्रक्रियेतून जावे लागते ज्यामुळे त्याचे फायबर निघून जाते. तर गव्हाला या प्रक्रियेतून जावे लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी गहू आणि तांदळाच्या पर्यायांबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ज्यामध्ये अनेक लोक तुम्हाला तांदळाऐवजी गहू खाण्याचा सल्ला देताना दिसतील. जरी आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर, दोन्हीमध्ये जवळजवळ समान प्रमाणात पोषक तत्व आढळतात, परंतु तांदळाच्या तुलनेत, गव्हामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे ते वजन कमी करण्यास प्रभावी ठरते.