Pre-Workout : एक्सरसाइज करण्यापूर्वी काहीही खाणं योग्य आहे का?

जाणून घेऊया एक्सरसाइज करण्यापूर्वी काय खाल्लं पाहिजे.

Updated: Apr 19, 2022, 07:54 AM IST
Pre-Workout : एक्सरसाइज करण्यापूर्वी काहीही खाणं योग्य आहे का? title=

मुंबई : व्यायाम करण्यापूर्वी तसंच नंतर खाण्याबाबत खूप काळजी घेण्याची गरज आहे. रिकाम्या पोटी व्यायाम करणं किंवा व्यायामानंतर काहीही न खाणं यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर व्यायामापूर्वी किंवा नंतर लगेच जास्त खाल्ल्यानंतर काहींना उलट्या, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 

व्यायामापूर्वी किंवा नंतर योग्य आहार न घेतल्यास शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा ऊर्जेसाठी वापर होतो. त्यामुळे परिस्थितीत, व्यायामानंतरच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जाणून घेऊया एक्सरसाइज करण्यापूर्वी काय खाल्लं पाहिजे.

प्री-वर्कआउटमध्ये काय खावं?

प्री-वर्कआउटमध्ये तुम्ही लो फॅट, कार्ब, प्रोटीन, कमी फायबर आणि लिक्विड यांसारख्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. मसल्सला एनर्जी देण्यासाठी तुम्ही ब्रेडचा तुकडा, थोडा पास्ता (हेल्दी), तांदूळ किंवा अंडं खाऊ शकता. तर एक्सरसाइज करण्याच्या दोन तास अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकता. पण त्यानंतर गरज असेल तेव्हा फक्त दोन कप पाणी प्यावं.

एक्सरसाइजपूर्वी किती वेळ अगोदर खाल्लं पाहिजे?

एक्सरसाइज करण्यापूर्वी अर्धा तास किंवा 45 मिनिटं अगोदर तुम्ही खाल्लं पाहिजे. शिवाय एक्सरसाइज करण्यापूर्वी अतिप्रमाणात खाणं किंवा पाणी पिणं योग्य नाही.