मुंबई : दररोज सकाळी उठल्यावर अंघोळ करणे का आपल्या नेहमीच्या कामांपैकी एक भाग आहे. त्याप्रकारे केस धुणे हा देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु बऱ्याच लोकांना याबाबत अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. केसांना कधी शॅम्पू करावे आणि कधी करु नये, याबद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थीत झाले आहेत. खरंतर यासाठी काही रॉकेट सायन्स नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल.
जेव्हा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खालील लक्षणे दिसू लागतात, तेव्हा समजून घ्या की तुम्हाला केस धुवावे लागतील.
केस धुवल्यानंतर केसांमध्ये तेल दिसू लागले, म्हणजेच केस चिकट दिसू लागले, तर केस धुणे आवश्यक आहे. परंतु जर तुमचे केस लवकर तेलकट होत असतील आणि तुम्हाला रोज केस धुवायचे नसतील, तर तुम्ही ड्राय शॅम्पू देखील वापरू शकता.
तसेच तुमच्या केसांमध्ये टाळूची त्वचा दिसू लागली असेल किंवा जर तुम्ही तुमचे डोके थोडेसे खाजवले आणि तुमच्या नखांमध्ये घाण जमा होत असेल तर याचा अर्थ असा की तुमचे केस घाण झाले आहेत.
जर तुम्ही केस बराच वेळ धुतले नाही, तर केसांमध्येही गाठी तयार होतात. जर तुमचे केस खूप विस्कटलेले असतील, तर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुवावेत.
शिवाय केस धुतल्यानंतर त्यामधून शॅम्पू किंवा कंडिशनरचा वास येऊ लागतो. परंतु जेव्हा तुमच्या केसातून हा सुगंध येणे थांबवेल, याचा अर्थ असा की, केस धुण्यासाठी तयार आहेत.
तुमचे केस रोज धुतल्याने केस गळणे किंवा कोरडे होणे या समस्या उद्भवू शकतात, परंतु तुम्ही खूप दिवस शॅम्पू करु नका. तसेच, ड्राय शॅम्पू फक्त कधीकधीच वापरा याला रोजच्या वापरात आणू नका.