मुंबई : कोविड-19 ची तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर नेमकी कोणती औषधं घ्यावीत याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या उपचारांमध्ये, बॅरिसिटिनिब, रुक्सोलिटिनिब, सोट्रोविमाब, कॅसिरिविमाब-इमडेविमाब, टोसिलिझुमॅब किंवा सरिलुमॅब सारखी औषधं कोरोनाबाधित रूग्णाला दिली जाऊ शकतात.
बॅरिसिटिनिब, टोसिलिझुमॅब किंवा सरिलुमॅब आणि सिस्टेमिक कॉर्टिकोस्टिरॉईड्स यांसारख्या औषधांवर तज्ज्ञ जोर देत आहे. तसंच रूक्सोलिटिनिब, टोफॅसिटिनिब, सोट्रोविमाब आणि कॅसिरिव्हिमाब-इमडेविमाब ही औषधं काही विशिष्ट परिस्थितींमध्येच रुग्णाला देण्यात यावीत अशी शिफारस या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला आहे.
या सर्व औषधांमुळे व्हायरसची तीव्रता कमी होत असल्याचा दावा डब्ल्यूएचओने केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वात काही औषधांचा वापर न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
WHO ने ivermectin, hydroxychloroquine, lopinavir/ritonavir आणि remdesivir सारखी औषधं न वापरण्याचा सल्ला दिला आहे. यातील काही औषधे क्लिनिकल ट्रायल्ससाठी पाठवल्याची चर्चा आहे.
WHO च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कॅसिरिविमाब-इमडेविमाब हे औषध कोरोनाची लागण झालेल्या मुलांसाठी वापरलं जाऊ शकतं. WHOच्या म्हणण्याप्रमाणे , 'कोविड-19 मुळे फार कमी मुलं गंभीर आजारी पडत असल्याची नोंद आहे. त्यामुळे ज्या मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसतायत त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकतं.