What Causes Cancer: कर्करोग म्हणजे काय? कर्करोग हा एक धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात, याला कर्करोग म्हणतात.
कर्करोगाची कारणे कोणती? कर्करोगाचे कोणतेही एक कारण नाही. कौटुंबिक इतिहास, वातावरण किंवा एखाद्या व्यक्तीची जीवनशैली इत्यादी अनेक घटकांचा समावेश आहे. तथापि, काही गोष्टी कर्करोगाचा धोका वाढवतात जसे की तुमच्या खाण्याच्या सवयी, काही अनुवांशिक विकार, काही प्रकारचे विषाणू जसे एचआयव्ही इ. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव सांगत आहेत की खाण्याशी संबंधित कोणत्या वाईट सवयींमुळे कर्करोग होऊ शकतो.
सद्गुरूंच्या मते, कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांच्या होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. सध्या 14 प्रकारचे कर्करोग माणसाच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करत आहेत. गेल्या 5 ते 7 वर्षांत या कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. मात्र यातील 8 कॅन्सरची सुरुवात ही पोटातून होते.
सद्गुरुंनी सांगितले की पोटापासून सुरू होणाऱ्या कॅन्सरचे खरे मूळ कारण आहे, तुमचा आहार. तुम्ही काय खाता आणि तो पदार्थ किती जुना आहे. हे समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक लोक जाणूनबुजून किंवा नकळत काही महिने जुन्या वस्तूंचे सेवन करत राहतात. पदार्थांवरची एक्सपायरी डेट पाहत नाहीत.
(हे पण वाचा - कमी पाणी प्यायल्यामुळे फक्त किडनीच नाही तर हे 4 अवयव होतात निकामी)
सद्गुरूंच्या मते, तुम्ही जे काही भाज्या, मांस, पास्ता, ब्रेड किंवा इतर वस्तू खरेदी करत आहात, त्या प्रत्यक्षात काही महिन्यांच्या आहेत. या गोष्टी कधीही खाऊ नयेत. खाण्याचे पदार्थ कशापद्धतीने साठवतो, ते देखील महत्त्वाचे आहे. हे अन्नपदार्थ कुजणार नाहीत अशा पद्धतीने साठवले जातात. पण या गोष्टींमध्ये तामस जमा होतो. तामस म्हणजे जडत्व. तुमच्यासाठी जडत्व म्हणजे मृत्यू. जर तुम्हाला या 8 प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर तुम्ही काय खात आहात हे लक्षात ठेवा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)