मुंबई : ग्रे हेअर म्हणजेच केस पिकण्याची समस्या आजकाल अनेकांना सतावते. केवळ प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तीचं नव्हे तर आजकाल तरूणांमध्येही कमी वयात केस पिकण्याची समस्या जाणवते. अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली या दोन गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. पांढरे केस लपवण्यासाठी बहुतांश लोकं विविध प्रोडक्सचा वापर करतात. मात्र काही घरगुती उपयांनी देखील केस पिकण्याची समस्या टाळली जाऊ शकते.
हेअर एक्सपर्टच्या म्हणण्याप्रमाणे, तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतं. ज्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते
- तुळशीची पानं घ्या
- आवळ्याच्या पानांचा आणि भृंगराज रस करा
- आता या तिन्ही गोष्टींचं चांगलं मिश्रण तयार करा आणि केसांमध्ये लावा
कडीपत्त्यामध्ये बायो अॅक्टिव्ह तत्त्व असतात. यामुळे केसांना भरपूर प्रमाणात पोषण मिळतं. कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येवर कडीपत्त्यांचा लेप लावू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जे तेल वापरता त्यामध्ये कडीपत्ता टाकून हे तेल डोक्याला लावा
लिंबामध्ये असलेले घटक केस काळे होण्यास प्रभावी ठरतात.
आयुर्वेदानुसार 15 मिली लिंबाचा रस घ्या आणि आवळ्याची 20 ग्रॅम पावडर घ्या.
आता या दोन्ही गोष्टींचा लेप तयार करून तो केसांना लावा
तासभर हा लेप राहूद्या आणि त्यानंतर केस धुवून घ्या
काही दिवसांच्या वापराने केस काळे होण्यास याचा फायदा होईल