White Hair Remedy : इवल्याशा लवंगाने करा पांढरे केस काळे! घातक हेअर कलर विसरून जाल

White Hair Remedy : कामाचा ताण आणि अनेक कारणांमुळे वेळेआधीच महिला असो किंवा पुरुष यांचे केस पांढरे होत आहेत. अशावेळी मार्केटमधील घातक हेअर कलर वापरण्यापेक्षा आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत. तुमच्या किचनमधील इवल्याशा लवंगाने तुम्ही पांढरे केस काळे करु शकता.     

नेहा चौधरी | Updated: Jun 6, 2024, 01:25 PM IST
White Hair Remedy : इवल्याशा लवंगाने करा पांढरे केस काळे! घातक हेअर कलर विसरून जाल title=
White Hair Remedy how to use cloves for grey hair in marathi

Cloves for grey hair : बदलेली जीवनशैली, ताण, टेन्शन आणि अनेक आजारांमुळे वेळेआधीच महिला असो पुरुष यांच्या केसाशी संबंधित समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अनेकांना कोंडा, निर्जीव केस, केस गळणे आणि पांढऱ्या केसाची समस्या निर्माण झाली आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी मार्केटमध्ये असंख्य प्रोडक्ट उपलब्द आहे. पण हे प्रोडक्ट आपल्या केसासाठी धोकादायक आणि घातक ठरतात. त्यामुळे आज असंख्य लोक आयुर्वैदिक आणि नैसर्गिक उपायांचा वापर करत आहेत. तुम्हाला पांढऱ्या केसाची समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला काळे केस करण्यासाठी किचनमधील लवंगाचा उपाय सांगणार आहे. लवंगाचा वापर केल्यास केसाला अनेक फायदे मिळतात. 

केसासाठी लवंगचा वापर कसा करायचा?

पांढरे केस काळे करण्यासाठी लवंगापासून एक हेअर पॅक तयार करायचा आहे. ही प्रक्रिया मेहंदी लावण्यासारख आहे, पण जरा वेगळी आहे. कसा तयार करायचा हा हेअर पॅक जाणून घ्या. 

- पहिले 10 ग्रॅम लवंगा घ्या.
- आता त्यात 3 चमचे एरंडेल तेल मिक्स करा.
- आता एका छोट्या भांड्यात पाणी उकळ्याला ठेवा. आता लवंग आणि एरंडेल तेल मिक्स उकळत्या पाण्यात टाका. 

-  आता या भांड्यावर झाकून ठेवून 10 मिनिटं उकळा.
-  आता या मिक्समध्ये 1 लहान वाटी आवळा पावडर घाला.
- आता त्यात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा आणि केसाला लावा.
-  40 मिनिटानंतर केस धुवा. 
- महिन्यातून 3 वेळा लावा ही पेस्ट वापरा. 

हेसुद्धा वाचा - आतड्यांमध्ये मल सुकताच शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, 4 आयुर्वेदिक उपायांनी बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

लवंगमुळे खरंच केस काळे होतात का?

उच्च युजेनॉलमुळे, लवंग नैसर्गिक केस वाढवणारे म्हणून काम करतं. त्यात युजेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असते जे ऑक्सिडेशनच्या नुकसानापासून केसाच्या मुळांना आणि फॉलिकल्सचे संरक्षण करतं. अशा प्रकारे पांढरे केस काळे होण्यास मदत मिळते. 

एवढंच नाही तर लवंगाचे तेल केसांना चमकदार बनवण्यातही फायदेशीर ठरतं. हे टाळूची हळुवारपणे साफसफाई करून, तुमच्या केस घनदाट करतं. त्याशिवाय लवंग तेलामध्ये असलेले नैसर्गिक संयुगे केसाचा पोत सुधारण्यास मदत मिळते.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x