मुंबई : स्वच्छ दातांमुळे चेहऱ्यावरील हास्य अधिक खुलते. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते.
ड्रिंक करणे, स्मोकिंग, खाण्याच्या विविध सवयींचा परिणाम दातांवर होत असतो. अनेकदा खाल्ल्यानंतर पदार्थ दातात अडकतात ते वेळीच साफ केले नाहीत तर दात खराब होऊ शकतात. दातांवर पिवळेपणा चढू शकतो.
त्यामुळे दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता. यासाठी बेकिंग सोड्याचा वापर फायदेशीर ठरतो.
बेकिंग सोडा आणि लिंबाचे मिश्रण करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन नेहमीप्रमाणे दात घासा. मिनिटांत तुमचे दात मोत्यासारखे चमकदार होतील.