जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की दूषित अन्न कर्करोग आणि मधुमेहासारख्या धोकादायक आजारांना आमंत्रण देत आहे. WHO ने यावेळी ‘जागतिक अन्न सुरक्षा दिना’ची थीम दिली आहे ‘अनपेक्षित गोष्टींसाठी तयार रहा. म्हणजे आता जंक फूड, पॅक्ड फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड सोडून देण्याची वेळ आली आहे. आता ताजे आणि निरोगी अन्न खाण्याची सवय लावा. तरच आपण सर्व रोगांपासून वाचू शकतो.
सध्या दूषित अन्न खाल्ल्याने कर्करोगाचे २०% पेक्षा जास्त रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक आहेत. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बैठी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीतील बदल. अतिप्रक्रिया केलेले अन्न आणि निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्ल्याने 200 हून अधिक आजार होत आहेत. हे रोग लठ्ठपणा आणि आतड्यांमधून उद्भवतात. जे पुढे कर्करोगाचे रूप घेत आहे. एवढेच नाही तर संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, खराब झालेले अन्न खाल्ल्याने जगभरात 60 कोटी लोक दरवर्षी आजारी पडतात. भारत या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 15 लाख लोक खराब अन्नामुळे मरतात. ज्यामध्ये 40 टक्के 5 वर्षांखालील मुले आहेत.
खराब अन्नामुळे कोणता आजार होतो?
खराब अन्नामुळे अनेक आजार होतात. त्यापैकी, पोटात पेटके, अपचन, कोलायटिस, पेप्टिक अल्सर, स्वादुपिंडाचा दाह, कर्करोग इत्यादी होण्याची शक्यता असते.
स्वच्छता महत्त्वाचा
घरी जेवण बनवताना आजूबाजचा परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. हातांची स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे तितकी स्वच्छता स्वयंपाकघराची असणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा फूड पॉइजनिंग होण्याची दाट शक्यता असते.
कच्चे पदार्थ टाळा
अनेकदा आपण सलाडमध्ये कच्चा पदार्थांचा समावेश करतो, ते आरोग्यासाठी टाळावे. मासे किंवा मांस कच्चे खाणे टाळा. तसेच कच्चा पदार्थ फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये पदार्थ फ्रेश राहतात.
न धुता फळे खावू नका
अनेकदा हेल्दी राहण्याच्या नादात आपण असंख्य चुका करतो. कारण फळे अस्वच्छ किंवा न धुता खावू नये. अनेकदा फळांवर पेस्टीसाईड मारले जाते. तसेच फळे चमकवण्यासाठी व्हॅक्स मारले जाते. ते स्वच्छ धुतल्याशिवाय निघत नाही. अशावेळी फळे धुवून खावीत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)