Soak Mango Benefits: उन्हाळ्यात आंबे पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. काही लोक आंबा खाण्यासाठी उन्हाळा ऋतूची वाट पाहत असतात. पण आंबा खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की जास्त मद्यपान करू नका. आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. ही पद्धत फार जुनी आहे. परंतु बहुतेक लोकांना याची माहिती पण नसेल, आंबे खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवून ठेवतात ? पण यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊयात...
आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या मदतीने तुम्ही एक नाही तर अनेक आरोग्य समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. अनेकदा लोकांना असे वाटते की अशा गोष्टी करण्यामागे रासायनिक कारणे असू शकतात. त्यापैकी काही खरे आहेत, परंतु याशिवाय अनेक कारणे आहेत ज्यांबद्दल तुम्हाला माहिती नसेल. बाजारातून आंबा आणल्यानंतर लगेच खायला सुरुवात केली तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आंब्याला पाण्यात 30 मिनिटे तरी पाण्यात भिजवून ठेवा. जर तुम्ही आंबे पाण्यात न भिजवता खाल्ले तर तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर पिंपल्स येऊ शकतात. या व्यतिरिक्त पोटाची उष्णता वाढू शकते.
आंब्यामध्ये भरपूर उष्णता असते आणि पाण्यात भिजवण्याची प्रक्रिया त्यांना अधिक तापमान तटस्थ बनवते. पाण्यात आंबे भिजवल्यास त्यातील उष्णता कमी होते. आंबे 15-20 मिनिटे पाण्यात भिजवल्यानंतर पाण्यातून काढून फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून चव घेऊ शकता.
आंबा पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याची उष्णता कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही बाजारातून आणून लगेच खाल्ल्यात तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. याशिवाय तुम्हाला मळमळ आणि उलटीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे आंब्यामधील उष्णता कमी करण्यासाठी पाण्यात 25 ते 30 मिनिटे भिजत ठेवा त्यानंतर आंब्याची मजा घ्या...
आंबा पाण्यात भिजवल्याने सर्व कीटकनाशके व रसायने निघून जातात. यासोबतच आंब्यावर साचलेली घाण, धूळ, माती पूर्णपणे निघून जाते. असे केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून बचावू शकता.
आंब्यामध्ये फायटिक ऍसिड नावाचा नैसर्गिक पदार्थ असतो. फायटिक ऍसिड कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांचे शोषण रोखते, ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता होऊ शकते. अशावेळी आंब्याला काही तास पाण्यात भिजवून ठेवल्यास फायटिक अॅसिड दूर होण्यास मदत होते.
आंबामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. म्हणूनच जे लोक मधुमेह किंवा वजनाची काळजी घेत आहेत ते लोक ही आंब्याचे सेवन करू शकतात. भिजवलेला आंबा खाल्ल्याने शरिराला कोणतीही इजा होत नाही. तसेच प्रत्येकजण सहजतेने त्याचे सेवन करू शकतो. आंबा हा फळांचा राजा मानलो जातो, त्यात भरपूर पोषक तत्वे असतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)