Walnut Benefits: ड्रायफ्रूट्समध्ये सरस ठरणाऱ्या अक्रोडचं महत्व आहे तरी काय? जाणून घ्या...

Walnut Benefits: अक्रोडमध्ये असं नेमकं काय असतं? जेणेकरुन, डॉक्टर्ससुद्धा अक्रोड खाण्याचा सल्ला देतात आणि कोणत्या कारणामुळे अक्रोडची किंमत ऐवढी जास्त असते? याबद्दल जाणून घेऊया...

Updated: Sep 30, 2022, 11:13 AM IST
Walnut Benefits: ड्रायफ्रूट्समध्ये सरस ठरणाऱ्या अक्रोडचं महत्व आहे तरी काय? जाणून घ्या... title=

Walnut benefits: ड्रायफ्रूट्स म्हटलं की पौष्टिक तत्व हे आलेच पण बदाम, काजू, अंजीर, पिस्ता यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये सरस ठरतो तो अक्रोड. ड्रायफ्रूट्सच्या सर्व पदार्थांच्या तुलनेत अक्रोडची किंमत ही प्रचंड महाग असते. अक्रोडची किंमत सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेलच असं काही नाही. अक्रोडमध्ये असं नेमकं काय असतं? जेणेकरुन, डॉक्टर्ससुद्धा अक्रोड खाण्याचा सल्ला देतात आणि कोणत्या कारणामुळे अक्रोडची किंमत ऐवढी जास्त असते? याबद्दल जाणून घेऊया...

पौष्टिकतेचासाठा म्हणजे अक्रोड

दररोज सकाळी रिकाम्यापोटी भिजलेले अक्रोड खाल्ल्याने तुमचं आरोग्य केवळ निरोगीच राहील असं नाही तर व्हिटॅमिन्स आणि मिनेरल्सच्या सर्व आजारांपासून दूर ठेवते. फायबर, प्रोटीन, कॅल्शियन, मॅग्निशियम, आयरनचं भरपूर प्रमाण असतं. याशिवाय, अक्रोडमध्ये फॉस्फोरस, कॉपर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील उत्तम प्रमाणात उपलब्ध असतं. सर्वांनी आपल्या आहारात अक्रोडचा समावेश करायला हवा.

अक्रोडमुळे उत्तम झोप येते

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुखाची झोप मिळणं हे खुप अवघड झालं आहे. दैनंदिन जीवनातील वाढत्या समस्यापाहता झोपेमुळे अनेक आजार निर्माण होतात. या आजारांच निदान करण्यासाठी आहार तज्ज्ञांकडून अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोड खाल्ल्याने तणाव दूर करण्यास मदत मिळते आणि यामुळे सुखाची झोप येते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)