पाणी पिण्याइतकंच कोवळं ऊन ही आरोग्यासाठी लाभदायक, एकापेक्षा एक फायदे वाचाच!

Sunlight Benefits: कोवळ्या उन्हा व्यायाम करा किंवा फिरायला जा, असं नेहमीच आपले पूर्वज सांगत आले आहेत. जाणून घ्या कोवळ्या उन्हाचे फायदे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 31, 2023, 04:31 PM IST
 पाणी पिण्याइतकंच कोवळं ऊन ही आरोग्यासाठी लाभदायक, एकापेक्षा एक फायदे वाचाच! title=
why you should have sunlight daily know positive effects in marathi

Morning Sunlight Benefits In Marathi: उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याच्या प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळं सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळं त्वचेचे नुकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तदुंरस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत. मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. यातीलच एक व्हिटॅमिन म्हणेज डी. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन-डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन-डीचे उत्पादन करु शकत नाही. त्यामुळं डॉक्टर रोज 20 ते 30 मिनिटे कोवळ्या उन्हात उभं राहण्याचा सल्ला देतात. 

व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणांपासून मिळते. मात्र, सूर्यांच्या प्रखर किरणांऐवजी पहाटेची कोवळी उन्हे घ्या. सूर्याची कोवळी किरणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळं केवळ शारिरीक नव्हे तर मानसिक रोगही दूर होतात. सूर्याच्या किरणांमुळं शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घेऊया. 

तणाव कमी होतो

सकाळ- सकाळ कोवळ्या उन्हात बसल्याने किंवा वॉक घेतल्याने शरीरात मेलाटोनिन नियंत्रित करण्यास मदत मिळते. यामुळं तणाव व स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळं ताण-तणावही कमी होतो. फक्त कोवळ्या उन्हात बसण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीदेखील करु शकता. ज्यामुळं तुमचा तणाव कमी होऊ शकतो. 

रोगप्रतिकार शक्ती वाढवा 

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. सूर्याची किरणांमुळं कमी वेळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर अनेक आजारांचा धोका कमी होतो. 

हाडं मजबूत करण्यासाठी 

हाडं ठिसूळ असतील तर कॅल्शियमच्या बरोबरच व्हिटॅमिन डीचीदेखील मुख्य भूमिका असते. सूर्याची किरणे व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत असतात. तुम्ही 15 मिनिटे जरी कोवळ्या उन्हात व्यायाम केला किंवा चाललात तर हाडांना बळकटी येते. डॉक्टरही हिवाळ्यात कोवळ्या उन्हात फिरण्याचा सल्ला देतात. 

निरोगी झोपेसाठी

जर रोज 1 तास कोवळ्या उन्हात बसल्यास किंवा व्यायाम केल्यास रात्री चांगली झोप येते. याचे कारण म्हणजे तुम्ही जितके जास्तवेळ कोवळ्या उन्हात बसाल तितकं झोपताना तुमचे शरीर जास्त मेलाटोनिन निर्माण करते. ज्यामुळं तुम्हाला खूप चांगली झोप येते. 

वजन नियंत्रणात राहते

सूर्याची कोवळी किरणे आणि बीएमआय याच्यांत थेट संबंध आहे. कोवळे उन्हात बसल्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी होते. ज्यामुळं वजन झपाट्याने कमी होते. हिवाळ्यात कमीतकमी 15 मिनिटे उन्हात बसलं पाहिजे जेणेकरुन तुमचं वजन नियंत्रणात राहिल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)