Myopia In Children: मोठी असो वा लहान मुले, आजकाल प्रत्येकजण तासनतास मोबाईल फोनवर असतो. मुले बाहेर खेळण्याऐवजी घरातच मोबाईलवर गेम खेळतात किंवा रिल्स पाहतात. पण मुलांच्या या सवयीमुळे ते स्वत:च्या डोळ्यांसोबतच आरोग्याचेही (मायोपिया) नुकसान करुन घेताहेत हे तुमच्या लक्षात येतंय का? यामुळे मुलांना मायोपियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही डोळ्यांची एक गंभीर समस्या आहे. जी दृष्टीवर परिणाम करते. मायोपिया कसा टाळावा आणि सुरुवातीच्या दिवसात त्याची लक्षणे कोणती दिसतात? याबद्दल जाणून घेऊया.
मायोपिया झालेल्यांना दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण येते आणि त्याला जवळची दृष्टी देखील म्हणतात. अशा स्थितीत डोळे दूरच्या वस्तूंवर नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्यांमध्ये प्रकाश योग्य प्रकारे परावर्तित न झाल्यामुळे असे घडते. त्यामुळे गोष्टी अस्पष्ट दिसतात.
डोकेदुखी
दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसतात आणि जवळच्या वस्तू जवळ दिसतात.
डोळ्यावरील ताण
दूरच्या गोष्टी पाहण्यासाठी डोळे वटारणे
टीव्ही पाहताना खूप जवळ बसणे इ.
अधिक लुकलुकणे
वारंवार डोळा चोळणे
आजकाल मुलांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे आणि त्यामुळे त्यांना बाहेर खेळायला कमी आवडतं आणि जास्त वेळ फोन किंवा कॉम्प्युटर स्क्रीनसमोर घालवायला आवडतं. त्यांच्या डोळ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होतो. ज्यामुळे मुलांमध्ये मायोपियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अशा परिस्थितीत, आपण काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. मुलांमधील मायोपियाचा धोका कमी करण्यासाठी काय उपाय करायचे? हे जाणून घेऊया.
स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमची मुले फोन, टीव्ही किंवा कॉम्प्युटर बराच वेळ वापरत असेल तर त्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी नियम बनवण्याचा प्रयत्न करा.
तुमचे मूल दररोज काही वेळ खेळण्यासाठी बाहेर जाते याची खात्री करून घ्या. कारण बाहेर खेळल्याने तुमच्या मुलाचे मायोपियापासून संरक्षण तर होतेच पण इतर अनेक फायदेही मिळतात.
थंडीमध्ये हात-पायांमध्ये खाज सुटणे आणि जळजळ होणे हा गंभीर आजार दर्शवतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मुलांना कमी प्रकाशात किंवा अंधारात पुस्तक वाचू देऊ नका किंवा फोन वापरू देऊ नका. कारण यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्या आणि याद्वारे डोळ्यांच्या समस्या ओळखून त्यावर प्राथमिक अवस्थेत उपचार करा.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)