World Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

World Osteoporosis Day 2022: आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Updated: Oct 20, 2022, 01:25 PM IST
World Osteoporosis Day 2022: वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत झाली? मग ही बातमी तुमच्यासाठीच! title=

World Osteoporosis Day 2022  : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. खाण्याचे सतत बदलते वेळापत्रक, बदलती जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूती अत्यंत गरजेची आहे. हाडे कमकुवत (weak bones) होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता (calcium deficiency). 

आजच्या काळात तरुणांनाही हाडांच्या समस्येला सामोरे जावे लागते. जेव्हा हाडे कमकुवत असतात तेव्हा सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होतात आणि काहीवेळा सांध्यातून चरकण्याचा आवाज येऊ लागतो. आज आपण अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुमची हाडे कमकुवत होऊ लागली आहेत.

आपल्या शरीरातील हाडं शरीराचा भार वाहतात. शरीराला आकार देण्यापासून तर शरीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचे काम हाडांचे असते. तेव्हा हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. 

कमकुवत हिरड्या (weak gums) :  जेव्हा हाडांच्या कमकुवतपणामुळे हिरड्यांचा (weak gums) त्रास होतो. तेव्हा जबड्याचे हाड (jaw bone) दातांवर पकड ठेवते आणि वयानंतर इतर हाडांप्रमाणे कमकुवत होते. जबड्याचे हाड तुटल्यामुळे हिरड्यातून दात बाहेर येऊ लागतात किंवा वेगळेही होऊ शकतात. कमकुवत जबड्यांमुळे दात देखील खराब होऊ शकतात.

हातांची पकड कमकुवत होणे (Weakness of hand grip) : हातांची पकड आणि मनगट, पाठीचा कणा आणि नितंब यांच्या हाडांची घनता (Bone density) यांच्यातील संबंध अनेक अभ्यासांमध्ये आढळून आला आहे. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांवरील अलीकडील अभ्यासात, संपूर्ण शरीरातील हाडांची घनता जाणून घेण्यासाठी हाताच्या पकडीची ताकद ही सर्वात महत्त्वाची शारीरिक चाचणी मानली गेली.

कमकुवत आणि तडतडणारी नखे : जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि कोलेजनची (calcium and collagen) कमतरता असू शकते. हे दोन्ही पोषक घटक मजबूत हाडांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कमकुवत नखे (weak nails) तुमच्या शरीराला आणि हाडांना या महत्त्वाच्या पोषक तत्वांची नितांत गरज असल्याचे प्रारंभिक लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते.

पेटके, स्नायू आणि हाडे दुखणे (Cramps, muscle and bone pain) : व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह काही जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे, शरीरात पेटके येऊ शकतात, स्नायू आणि हाडे दुखू शकतात. शरीरात या जीवनसत्त्वे आणि खनिजांची सतत कमतरता राहिल्यास भविष्यात हाडांची झीज होऊ शकते.

शरीराचे झुकणे : हाडे फ्रॅक्चर (Bone fracture) झाल्यामुळे शरीर पुढे झुकू लागते. हे कमकुवत हाडांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर तुमचा पाठीचा कणा जड वजनाशिवाय वाकत असेल किंवा मणक्याच्या आजूबाजूचे स्नायू खराब बसल्यामुळे कमकुवत होऊ लागले तर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली असण्याची शक्यता आहे.

वाचा : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?  

फिटनेस कमी होणे : जर तुमचा फिटनेस (Fitness) कमी होत असेल तर कदाचित तुमच्या हाडांची घनता कमी होत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वजन कमी करण्याच्या व्यायामामुळे हाडांची झीज कमी होते आणि कॅल्शियम आणि हाडे तयार करणाऱ्या पेशींद्वारे हाडे मजबूत होतात.

वेगवान हृदयाचे ठोके : सरासरी हृदय गती 60 ते 100 बीट्स प्रति मिनिट असते, परंतु तज्ञ म्हणतात की 80 बीट्स प्रति मिनिटापेक्षा जास्त पल्स रेट असल्यास हिप, ओटीपोट आणि मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. हृदय गती तुमची फिटनेस पातळी सांगते.