मुंंबई : कोड या आजाराबाबत समाजात जागृततेऐवजी गैरसमजच अधिक आहेत. कोड असणार्या लोकांबाबत, या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज आहेत. कोड या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 25 जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो.
मासे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने, आंबट किंवा पांढरे पदार्थ खाल्ल्याने कोड होतो असा समाजात गैरसमज आहे. मात्र कोणताही पदार्थ खाल्ल्याए कोड होत नाही. दुधासोबत चुकूनही हे ५ पदार्थ खाऊ नको
कोड हा आजार मूळीच संसर्गजन्य नाही. संपर्काने, एकत्र राहिल्याने, जेवल्याने हा आजार पसरत नाही. कोड हा अॅटोइम्युन आजार आहे.
कोड या आजारामध्ये रंगपेशी नष्ट झाल्याने त्वचा रंग पांढरा होतो. त्यामुळे लॅब टेस्टच्या मदतीने त्याचा धोका ओळखणं शक्य नाही. क्लिनिकल एक्झामिशनने कोड ओळखला जातो. तसंच कोडवर घरगुती उपाय करत राहण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सर्जिकल आणि नव्या औषधोपचारांच्या मदतीने या आजारावर परिणाम दिसू शकतो.
शरीरावर विविध कारणांमुळे पांढरे डाग निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकवेळेस तो कोड असेलच असे नाही. काही वेळेस कुष्ठरोग, भाजल्याच्या जखमेनंतरही त्वचेवर पांढरे डाग पडतात.
जर एखाद्या व्यक्तीला कोड असल्यास त्याच्या जवळच्या नात्यात म्हणजे पालकं, मुलं, भावडांमध्ये कोड पसरण्याची शक्यता 5% असते. किंवा 5 पट अधिक असते. तसेच पालकांकडून मुलांना कोड पसरण्याची शक्यता 15% असते.कोड कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र कोडच्या निम्म्या रूग्णांमध्ये तो वयाच्या 20व्या वर्षापूर्वी होतो तर 95 % लोकांमध्ये हा आजार वयाच्या चाळीशी पूर्वी विकसित व्हायला सुरूवात होते.