तुम्हाला सुद्धा 'अशी' झोपण्याची सवय असेल, तर तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता

चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे तुमच्या त्वचेवर पुरळ आणि सुरकुत्या येऊ शकतात.

Updated: Aug 13, 2021, 06:39 PM IST
तुम्हाला सुद्धा 'अशी' झोपण्याची सवय असेल, तर तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता

मुंबई : माणसाला आयुष्यात झोपेची खूप आवशकता आहे. अपूऱ्या किंवा कमी झोपेचा परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर होऊ शकतो. तसेच पुरेस्या प्रमाणात झोप घेतल्याने लोकांच्या अनेक समस्या नाहीशा होतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुमची स्लिपिंग पोझिशन किंवा झोपण्याची स्थिती तुमच्या त्वचेचे आणि आरोग्याचे नुकसान करते. आम्ही तुम्हाला आज त्यांच्याबद्दल माहितीही देणार आहोत. चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे तुमच्या त्वचेवर पुरळ आणि सुरकुत्या येऊ शकतात. जसे आपण श्वास घेतो, आपली त्वचा देखील श्वास घेते, त्यामुळे झोपताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.

तुमच्या झोपेच्या स्थितीमुळे तुमच्या डोळ्याला सूज, सुरकुत्या आणि पुरळ येऊ शकतात. अनेक वेळा तुम्ही अशा प्रकारे झोपता की, चेहऱ्याची एक बाजू उशीवर असते. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात, तसेच यामुळे तुमचे गाल एका बाजूने दाबले जातात. पुरळ टाळण्यासाठी उशाचे कव्हर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात बॅक्टेरिया असू शकतात आणि यामुळे त्वचेच्या समस्या होऊ शकतात.

उताणी झोपणे किंवा पाठीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती मानली जाते. अशाप्रकारे झोपल्याने, तुमच्या चेहऱ्याची त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते आणि  ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येत नाही आणि चेहरा दाबला देखील जात नाही. यामध्ये तुमचा चेहरा उशाच्या कव्हरला स्पर्श करत नाही. हे त्वचेच्या जळजळीपासून देखील संरक्षण करते.

पालथं झोपणे किंवा पोटावर झोपणे ही सर्वात वाईट झोपण्याची स्थिती आहे. यामध्ये तुमच्या चेहऱ्याची त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. ब्लड सर्कुलेशनवर देखील यामुळे परिणाम होते. यामुळे clogged pores आणि डोळ्याखाली फुगे येण्याच्या (under eye bags) समस्या उद्भवू शकतात, म्हणून अशा प्रकारे झोपण्याची सवय लगेच सोडा.

बहुतेक लोकं कुशी झोपतात, पण त्याचा सर्वात मोठा तोटा असा आहे की, जर तुम्ही तुमच्या त्वचेवर काहीतरी लावले असेल, तर ती गोष्ट उशावर येते आणि नंतर ती गोष्ट उशीलाल लागून संपते आणि त्याचा प्रभाव कमी होतो. त्याचबरोबर रोज रोज अशी कोणतीही क्रिम उशीला लागल्याने ती क्रिम काही दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर येते आणि त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.

त्याच प्रमाणे चेहऱ्यावर जास्त वेळ झोपल्यामुळे चेहऱ्यावर दाबाव येतो ज्यामुळे, वृद्धत्वाची समस्या सुरू होते कारण, अशा झोपेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि रेषा येऊ शकतात.