अर्ध्या तासात १०० किलो सोनं आणि ६०० किलो चांदीची विक्री

देशभरात ३० टन सोन्याची विक्री

Updated: Oct 29, 2019, 02:13 PM IST
अर्ध्या तासात १०० किलो सोनं आणि ६०० किलो चांदीची विक्री title=

मुंबई : देशातील सर्राफा बाजारातून दिवाळीच्या एक दिवसानंतर पाडव्याला नव्या वर्षाच्या ट्रेडिंग मुहुर्तावर अवघ्या अर्धा तासात १०० किलो सोनं विकलं गेलं. तर ६०० किलोची चांदी ही विकली गेली. दरवर्षीप्रमाणे ट्रेडिंग मुहुर्तावर इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशन याचं आयोजन केलं होतं.

आयबीजेएच्या माहितीनुसार, सोने-चांदी खरेदीसाठी शुभ मानल्या जाणाऱ्या धनतेरसला देशभरातील जवळपास ३० टन सोनं विकलं गेलं. तर मागच्या वर्षी ४० टन सोनं विकलं गेलं होतं.

असोसिएशनच्या माहितीनुसार, ट्रेडिंग मुहूर्ताच्या दरम्यान २४ कॅरेट सोनं ३८,६६६ प्रति १० ग्रॅम होतं. धनतेरसला २५ नोव्हेंबरला सोन्याचा भाव ३८,७२५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोन्यावर ३ टक्के टॅक्स लागतो.

धनतेरसला चांदीचा भाव ४६,७७५ रुपये प्रति किलो होता. २२ कॅरटच्या शुद्ध सोन्याचा भाव ३८,५७० रुपये प्रति १० ग्रॅम होता.