२०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर - निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने यावर्षी सप्टेंबरपर्यंत १६.१५ लाख व्हीव्हीपीएटी मशीन पुरवण्याची आवश्यकता होती. आतापर्यंत फक्त ४ लाख मशीन पुरविण्यात आल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 25, 2018, 08:07 PM IST
२०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर - निवडणूक आयोग title=

नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीएपीटी मशीनचा उपयोग केला जाईल, असा  दावा निवडणूक आयोगाने केला आहे. आयोगाने म्हटलेय की, निवडणुकीसंदर्भात १६.१५ लाख नवीन मशीनची खरेदी प्रक्रिया पूर्ण होत आहे. तसेच मशीनच्या उत्पादन आणि पुरवठ्याचाही आढावा घेण्यात येत आहे, असे आयोगाने स्पष्ट केलेय. मशीनचा पुरवठा हा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे १०० ०० टक्के व्हीव्हीएपीटी मशीनचा उपयोग करण्याचा दावा कसा पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ईव्हीएम् वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, व्हीव्हीएपीटी मशीन म्हणजेच व्होटर-वेरिअरिंग पेपर ऑडिट ट्रेल देखील ईव्हीएममध्ये स्थापित केले गेले आहे. या यंत्रास मतदान केल्यानंतर मतदाराला एक स्लिप मिळते, ज्यामध्ये ज्या मतदाराने मत दिले आहे ते योग्य उमेदवारांना गेले आहे की नाही, याची एक पावती किंवा स्लीप आहे.

गेल्यावर्षी १०० टक्के व्हीव्हीपीएटी मशीन पुरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची अंतिम मुदत निश्चित केली होती. निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात म्हटले होते की, व्हीव्हीपीएटी मशीन्स२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्णपणे वापरण्यात येतील.

व्हीव्हीपीएटी मशीन्ससाठी, ईसी ने हैदराबादमध्ये स्थित बंगळुरु इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेड (बीईएल) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबर करार केला होता. या कराराअंतर्गत या दोन्ही कंपन्यांना सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाला १६.१५ लाख मशीन पुरवण्याची आवश्यकता आहे. पण सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत फक्त ४ लाख मशीन पुरविण्यात आल्या आहेत.

गेल्यावर्षी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १६ लाख व्हीव्हीपीएटी मशीन्स खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाने ३ हजार कोटी रुपयांपर्यंत नवीन ईव्हीएम मशीन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

व्हीव्हीपीएटी मशीन

 तरतुदीनुसार मतदारांनी मतदान केले आहे किंवा नाही याबद्दल मत दिले आहे. व्हीव्हीपीएटी एक प्रकारचा प्रिंटर आहे जो ईव्हीएमला जोडला आहे. जेव्हा मत दिले जाते तेव्हा त्याला पावती प्राप्त होते. या स्लीपवर, उमेदवाराचा क्रम, क्रमांक, नाव आणि निवडणूक चिन्ह प्रदर्शित केले जातात. पावती दिल्यावर, ती ईव्हीएमशी जोडलेल्या कंटेनरमध्ये जाते.