14 वर्षांच्या मुलावर स्वत:चे अपहरण करण्याची वेळ का? या मागचे कारण ऐकाल तर थक्कं रहाल

त्यामुळे त्याचे आई-वडील बाजारात गेले, तेव्हा...

Updated: Jul 19, 2021, 07:06 PM IST
14 वर्षांच्या मुलावर स्वत:चे अपहरण करण्याची वेळ का? या मागचे कारण ऐकाल तर थक्कं रहाल title=

अंबाला : अनेक तरुण मुलांना चंदेरी दुनियेचं आकर्षण असतं, त्यासाठी हे तरुण काय वाटेल ते करण्याची तयारी बाळगतात. मग ते हे बरोबर करत आहेत की, चूकीचे याचा विचार ते करत नाहीत. यातून काही तरुणांना संधी देखील मिळाली आहे. तर काही तरुण मुलं या लखलखणाऱ्या दुनियेत जाण्याच्या मोहाला बळी पडले आहेत. असाच एका 14 वर्षाय तरुण मुलाने अभिनेता होण्याची उत्कटता मनात ठेऊन आपल्या आई-वडिलांना फसवण्याचा प्लॅन केला. हरियाणाच्या अंबाला येथे रहाणाऱ्या या मुलाने स्वतःचे अपहरण करण्याचे प्लॅनींग केले. मात्र, या मुलाला चंदीगडच्या विमानतळावरून दोन तासाच्या आत पकडले गेले, ज्यामुळे त्याचा प्लॅन फसला.

नक्की काय घडलं

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या नंबरवरून त्यांना मॅसेज आला की, त्यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. हा मॅसेज वाचल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली. दिवसा उजेडात अपहरण झाल्याची बातमी कळताच पोलिस सक्रिय झाले.

तक्रार मिळताच पोलिस स्टेशन महेश नगरचे एसएचओ अजयब सिंह त्यांच्या पथकासह मुलाच्या घरी गेले. यानंतर संपूर्ण प्रकरण एसपीकडे देण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन करण्यात आले.

पालक बाजारात गेले असता मुलगा घराबाहेर पडला

संयुक्त टीम पोलिस स्टेशन महेशनगर भागात 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे संदेश ज्या नंबरवरुन मिळाला त्या नंबरचे लोकेशन ट्रेस करत होते. तेव्हा त्यांना या मुलाचे लोकेशन मोहाली विमानतळाजवळ दाखवले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या कुटूंबांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता मुलाने सांगितले की, त्याला अभिनेता व्हायचे आहे. त्यामुळे त्याचे आई-वडील बाजारात गेले, तेव्हा त्याने घर सोडले. हे सगळं करण्याची योजना तो खूप आधीपासून करत होता. यासाठी या मुलाने आपली कपड्यांची बँग भरली होती आणि 18 हजार रुपये घेऊन घरातून निघून गेला.

किडनॅपींगचा संदेश कुटुंबाचे लक्ष विचलित करण्यासाठी

घरातून निघाल्यानंतर तो मुलगा बसमधून चंदीगडला पोहोचला आणि तेथून विमानतळावरून मुंबईला जाण्याची त्याची योजना होती. यादरम्यान, घरातील सदस्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याने स्वत:च्या फोनवरून त्याचे अपहारन झाल्याचा संदेश त्याच्या वडिलांना पाठवला.

मुलगा पकडला गेल्यानंतर तो आता खूप घाबरला असल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले.