पाकिस्तानातून तब्बल १५० अफगाण घुसखोर भारतात घुसखोरीच्या तयारीत

 अशांतता माजवण्याच्या उद्देशाने घुसखोरी

Updated: Aug 23, 2019, 01:23 PM IST
पाकिस्तानातून तब्बल १५० अफगाण घुसखोर भारतात घुसखोरीच्या तयारीत title=

नवी दिल्ली | पाकिस्तानातून तब्बल १५० अफगाण घुसखोर भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तहेर संस्थांनी दिला आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे खोऱ्यात अशांतता माजवण्याच्या उद्देशाने ही घुसखोरी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. १५० भाडोत्री अफगाण दहशतवादी पाकिस्तानच्या नेफा भागात आणण्यात आले. त्यानंतर ते आता भारतात घुसखोरीसाठी विविध लाँचपॅड्सवर पाठवण्यात आलेत अशी माहिती पुढे आली आहे. 

जैश ए मोहम्मद या दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. जैशचा म्होरक्या मसूद अझरचे तालिबानी अफगाण दहशतवाद्यांशी चांगले संबंध आहेत. भारतात विविध ठिकाणी हल्ले घडवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश असल्याचं उघड झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बहावलपूरच्या मरकझ उस्मान ओ अली इथे महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात हा कट रचल्याचं बोललं जातं आहे.

नागरिकांनी देखील आपल्या आजुबाजुच्या हालचालींवर नजर ठेवण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी खास करुन अलर्ट राहण्याची गरज आहे. काहीही संशयास्पद गोष्ट दिसल्याची त्याची माहिती लगेचच पोलिसांनी देण्याची गरज आहे.