भारतीय शास्त्रज्ञानाच्या या शोधामुळे सरकारची २०,००० कोटींची बचत

लष्कराचे वर्षाला २०,००० कोटी रुपये वाचणार 

Updated: Jun 10, 2017, 02:20 PM IST
भारतीय शास्त्रज्ञानाच्या या शोधामुळे सरकारची २०,००० कोटींची बचत title=

नवी दिल्ली : भारतात कतृत्ववान लोकांची कमी नाही आहे. त्यांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते जगाला आपलं कतृत्व दाखवून देतात. आज एक अशाच कतृत्ववान व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारतीय वैज्ञानिक प्रोफेसर शांतनु भौमिक यांनी असं तंत्रज्ञान समोर आणलं आहे ज्यामुळे लष्कराचे वर्षाला २०,००० कोटी रुपये वाचणार आहेत.

प्रोफेसर शांतनु यांनी भारतीय जवानांनसाठी एक बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं आहे. ज्यावर संरक्षण मंत्रालयाच्या कमेटीने शिक्कामोर्तब केला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानपासून बनवलेला हा जॅकेट अल्ट्रा मॉडर्न लाइटवेट थर्मो-प्लास्टिक टेक्नॉलजीपासून बनला आहे. याचं निर्माण पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया प्रॉजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याला हिरवा कंदील मिळताच याचं उत्पन्न सुरु होईल.

Image result for shantanu bhowmik DNA

भारत अमेरिकेकडून जॅकेट आयात करतो. एका जॅकेटची किंमत आता 1.5 लाख रुपये आहे. पण शांतनु भौमिकच्या जॅकेटची किंमत मात्र 50,000 रुपये असणार आहे. अशा प्रकारे भारत सरकारला या जॅकेटच्या खरेदीवर वर्षाला 20,000 कोटींची बचत होणार आहे.

वर्तमानात संरक्षण दलाकडे असलेल्या या जॅकेटचं वजन १५ ते १८ किलो आहे. पण या मॉडर्न जॅकेटचं वजन १.५ किलो आहे. यामध्ये कार्बन फायबरची लेयर आहे. ज्यामुळे ५७ डिग्रीपर्यंतच्या तापमानात पण हे काम करेल.