मित्र 'या' नावाने चिडवायचे, 24 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.. धक्कादायक घटना

देशात गेल्या काही वर्षांपासून युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नैराश्यामुळं किंवा क्षुल्लक कारणांमुळं मुलं टोकाचे पाऊल उचतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका 24 वर्षीय युवकाने संजीवनगर भागात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुण मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Oct 23, 2023, 05:42 PM IST
मित्र 'या' नावाने चिडवायचे, 24 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.. धक्कादायक घटना title=
24 years old youth suicide after his friend teasing him

Nashik Crime News: देशात गेल्या काही वर्षांपासून युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नैराश्यामुळं किंवा क्षुल्लक कारणांमुळं मुलं टोकाचे पाऊल उचतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका 24 वर्षीय युवकाने संजीवनगर भागात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुण मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

मित्र नशेडी म्हणत बदनामी करत असल्याने संजीवनगर भागात राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तीन संशयितावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ संजय पांडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

अंबड लिंक रोड भागातील संजीवनगर येथे दि. ११ सप्टेंबर रोजी सौरभ संजय पांडे याने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याची आई अनिता संजय पांडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सौरभ याचे संशयित अजय सरोज, विजय सरोज, अभी पवार हे मित्र होते, हे मित्र त्याला कायम 'तू नशेडी आहेस, आमच्या बरोबर राहत जाऊ नकोस असे बोलून त्याची बदनामी करत होते. असे फिर्यादीत म्हटले आहे.

 मित्रांच्या त्रासाला कंटाळून सौरभ याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तीन ही संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघा संशयितांना अंबड औद्योगिक वसाहत चुंचाळे पोलिस चौकीच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहेत. या प्रकरणी पुढील तपास चुंचाळे पोलिस करत आहे...

दारूसाठी वृद्ध महिलेचा खून 

व्यसनासाठी माणूस कोणता थराला जाईल हे सांगता येत नाही. दारू पीत असल्याची माहिती घरात सांगितल्याच्या रागातून एका तरुणाने वृध्द महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केलाय. ही धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील सुभाषनगर मध्ये घडली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ६५, मूळ गाव कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या राहणार संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर प्रतीक विनायक गुरुले (वय २२, रा. प्लॉट नंबर ४, संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.