नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या विरोधात युद्ध सुरू आहे. यामुळे देशात 21 दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले. ज्याचा कालावधी आज संपुष्टात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबाबत स्पष्ट करतील. पण लॉकडाऊनचा परिणाम अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. अशा परिस्थितीत बर्याच क्षेत्रातील आणि लोकांना आशा आहे की यावेळी थोडी सवलत मिळू शकेल.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही अशा 400 जिल्ह्यांना लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत मिळू शकते. परंतु देशातील 75 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं सावट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनात खासकरुन व्यवसाय, शेती या क्षेत्रातील लोकांना अपेक्षा आहेत. देशाने बैसाखीचा सण साजरा केला आहे, त्यानंतर मुख्य कापणीचा हंगाम सुरू होतो. परंतु लॉकडाऊनमुळे कामगार अजूनही कुठेतरी अडकले आहेत, मोठ्या संख्येने शेतात जाण्यास बंदी आहे.
अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात शेतकरी आणि मजुरांना काहीसा दिलासा देतील अशी आशा आहे. जेणेकरून पिकांचं व शेतकर्यांचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही. हेच काही उद्योगांच्या बाबतीतही होऊ शकते, जेथे पंतप्रधान काही अटी व शर्तींसह उत्पादनाचे काम सुरू करण्याविषयी बोलू शकतात.
या सर्व सवलतीत सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना जारी केली जाऊ शकतात. ज्यामध्ये कमीतकमी कर्मचारी कंपनीमध्ये उपस्थित असतील, सामाजिक अंतर पाळतील आणि स्वच्छताविषयक काळजी घेतील अशा सूचना दिल्या जातील.