बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक

बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विस्फोटक साहित्य सापडलं आहे.    

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2023, 11:03 AM IST
बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक title=

बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे स्फोटक साहित्य सापडलं आहे.  जुनैद, सोहेल, उमार, मुदशीर आणि जाहीद अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. 

केंद्रीय क्राइम ब्रांचने सीआयडीसह मिलून केलेल्या कारवाई 5 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. मोबाईलसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये स्फोटक साहित्यही आहे.  सध्या केंद्रीय क्राइम ब्रांच सर्वांची चौकशी करत आहे. अजून दोन संशयित यांच्यात सहभागी आहेत असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट

केंद्रीय क्राइम ब्रांच मादीवाला टेक्निकल सेलमध्ये संशयित दहशतवाद्यांची चौकशी करत आहे. पाचही संशयित दहशतवादी बंगळुरुमधील वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांनी बंगळुरुत स्फोट घडवण्याची योजना आखली होती असा तपास यंत्रणांना संशय आहे. 

हे पाचही संशयित 2017 मधील हत्या प्रकरणात आरोपी होते आणि परप्पाना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये बंद होते. यावेळी ते दहशतवाद्यांच्या संपर्कात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संशयित बंगळुरुत राहणारेच आहे. ते दहशतवाद्यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्याकडे दहशतवादी कारवायांसंबंधी सविस्तर माहिती होती. त्यांनी स्फोटकांसह तांत्रिक प्रशिक्षणही घेतलं होतं. सर्व संशयित एका टीमप्रमाणे काम करत होते. संशयितांनी बंगळुरुतील स्फोटांच्या योजनेचीही माहिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

सीसीबीच्या माहितीनुसार, या संशयितांजवळ 4 वॉकी टॉकी, 7 पिस्तूल, दारुगोळ्यासह स्फोटक साहित्य आणि हत्या सापडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच फरार असणाऱ्यांनाही आरोपी करण्यात आलं आहे. 

 

पुण्यात दोन दहशतवादी अटकेत

पुण्यातही दोन दहशतवादी पकडण्यात आले आहेत. पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आता दहशतवादी विरोधी पथक (Maharashtra Anti Terrorism Squad) आणि इतर यंत्रणांकडून संयुक्तपणे तपास केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांकडे दहशतवादाशी संबंधित सामग्री सापडली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गाडी चोरताना हे दोन्ही आरोपी पोलिसांना सापडले. यानंतर त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. कोंढव्यात भाड्याने राहणाऱ्या घऱात पोलिसांना कुऱ्हाड सापडली. तसंच लॅपटॅापमध्ये काही इस्लामिक साहित्य सापडलं आहे. हे दोघेही मूळचे मध्यप्रदेशचे आहेत. 

पोलिसांनी दोघांच्या घराची झडती घेतली असता जिवंत काडतूस, चार मोबाईल आणि एक लॅपटॉप सापडला. यानंतर दोघेही गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचं वाटत होतं. पुढील तपासात दोघांची ओळख पटली. युनूस आणि इम्रान हे दोघे एनआयएच्या वॉण्टेड यादीत असून, त्यांच्यावर 5 लाखांचं बक्षीस असल्याची माहिती हाती आली.