50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा; कायद्यात दुरुस्ती करून लुट केल्याचा आरोप

गोव्यात 50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा झाला आहे. फतोर्दाचे आमदार विजय सरदेसाई यांनी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. 

Updated: Aug 6, 2024, 11:41 PM IST
50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा; कायद्यात दुरुस्ती करून लुट केल्याचा आरोप title=

Goa Assembly: गोव्यात 50,000 कोटींचा औद्योगिक भूमी घोटाळा झाला आहे.  फतोर्दाचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा गंभीर आरोप केला आहे. औद्योगिक नावासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घरकुल योजनांसाठी महागड्या दरात विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. गोव्याच्या मुख्यमंतत्र्यांच्या या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला आहे. 

25 पैसे प्रति वर्ग मीटर दराने औद्योगिक भूखंड करण्यात आले. मात्र, हे औद्योगिक भूखंड  गृहनिर्माण योजनांसाठी महागड्या दरात विकण्यात आल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. प्रादेशिक आराखड्यामध्ये राहिलेल्या चुका सुधारण्यासाठी नगरनियोजन कायद्यात दुरुस्त्या आणण्यात आल्या. यानंतर दुरुपयोग करत भू-रूपांतरणे करून मोठ्या प्रमाणात भूखंड विक्री करण्यात आली. 

सुरुवातीला 53,000 रुपये प्रति वर्ग मीटर दराने हे भूखंड विकण्यात आले.  सैनकोले येथील  औद्योगिक भूखंड 1.19 लाख रुपये प्रति वर्ग मीटरला विकली जात आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आगे. औद्योगिक उपयोगासाठी आरक्षित असलेल्या जमीनी मोठ्या दराने घरबांधणीसाठी विकले जात आहेत. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

डाबोलिम विमानतळाजवळ असलेल्या भूखंडांना भारतीय नौदलाने उंचीबाबतचे निर्बंध घातलेले आहेत. असे असतानाही एनओसी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सैनकोले येथे ज्युआरी इंडस्ट्रीज लिमिटेडने विकत घेतलेल्या जमीनीच्या चौकशी आदेश दिले असल्याचा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधीमंडळात केला आहे. चौकशीत आरोपांबाबत काही तथ्या आढल्यास मंजूरी रद्द केल्या जातील असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.