कोरोना: देशात २४ तासात ५६०९ नवे रुग्ण, १३२ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ सुरुच

Updated: May 21, 2020, 12:19 PM IST
कोरोना: देशात २४ तासात ५६०९ नवे रुग्ण, १३२ रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : देशातील कोरोना रूग्णांची संख्या एक लाख 12 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 359 वर पोहोचली आहे. यापैकी 3435 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाशी युध्द जिंकणाऱ्यांचा आकडा वेगाने वाढत आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत 45 हजार 299 लोक बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 5609 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज 5 हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारीही 5611 नवे रुग्ण वाढले. सध्या देशात 63 हजार 624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरात नंतर तामिळनाडूमध्ये संसर्ग झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 39 हजार 297 रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत येथे 2250 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गुजरातमध्ये एकूण 12,539 रुग्ण आहेत. 24 तासात येथे 398 रुग्ण वाढले आहेत. तामिळनाडूमध्ये आता गुजरात पेक्षा अधिक 13191 रुग्ण आहेत. 24 तासांत 743 नवीन रुग्ण येथे वाढले आहेत.

दिल्लीत रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पलीकडे आहे. आतापर्यंत येथे 176 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5192 लोक बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 6 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत येथे 147 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर मध्य प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 5735 आहे, ज्यामध्ये 267 लोकांचा बळी गेला आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 249 नवे रुग्ण वाढले आहेत. आता राज्यात एकूण रूग्णांची संख्या 5 हजार 175 झाली आहे. यापैकी 3 हजार 66 लोक बरे झाले आहेत, तर 127 लोकांचा मृत्यू झाला आहे.