मुंबई : देशातील कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजारांपेक्षा वर गेली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 आहे. यापैकी 3583 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 48 हजार 534 लोकं बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 6088 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज 5 हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारीही 5611 रुग्ण वाढले होते. गुरुवारी 5609 रुग्ण वाढले होते. सध्या देशात 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक 41 हजार 642 रुग्ण आहेत. 24 तासात येथे 2345 रुग्ण वाढले आहेत. गुजरातमध्ये एकूण 12 हजार 910 रुग्ण आहेत, 24 तासांत 371 रुग्ण येथे वाढले आहेत. तर तामिळनाडूमध्ये 13 हजार 967 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. 24 तासांत 776 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दिल्लीत रूग्णांची संख्या 11 हजार 659 वर पोहोचली आहे. येथे आतापर्यंत 194 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5567 लोक बरे झाले आहेत. राजस्थानमधील कोरोना रूग्णांची संख्या 6227 आहे. आतापर्यंत येथे 151 लोकाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 5981 आहे. ज्यामध्ये 270 लोकांचा बळी गेला आहे.