70 वर्षांच्या आजोबांना करायचंय पी. व्ही. सिंधूशी लग्न

लग्नाची व्यवस्था केली नाही, तर...

Updated: Sep 19, 2019, 02:48 PM IST
70 वर्षांच्या आजोबांना करायचंय पी. व्ही. सिंधूशी लग्न

चेन्नई : तमिळनाडूतील रामनाथपुरम येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाने त्याला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूशी लग्न करायचं असल्याचं म्हटलंय. जर लग्नाची व्यवस्था केली नाही, तर आपण तिचं अपहरणही करू असं त्या वृद्धाकडून सांगण्यात आलं आहे. मलाईसामी असं या चेन्नईतल्या वृद्धाचं नाव आहे.

हे प्रकरण साप्ताहिक सुनावणी दरम्यानचे आहे, जेथे जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात जनतेच्या तक्रारी ऐकतात. यावेळी लग्नासाठी याचिकाही त्यांनी दाखल केली आहे.

मलाईसामी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची तक्रार घेऊन पोहचले होते. यावेळी त्यांनी गोल्ड मेडल विजेता सिंधु आणि स्वत:च्या फोटोसह एक अर्ज दिला. त्या अर्जात सिंधुसह लग्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आपला जन्म 4 एप्रिल 2004 रोजी झाला असून 16 वर्ष वय असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

सध्या पी. व्ही सिंधु चांगझोउच्या (चीन) दौऱ्यावर आहे. चीन ओपन-2019 मध्ये गुरुवारी सिंधूची थायलंडच्या Pornpawee Chochuwong विरुद्ध लढत होणार आहे.