मुंबई : 7th Pay Commission | नुकतेच केंद्र सरकारने कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीएमध्ये (DA) वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत 45 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे पैसे येतील, असा अंदाज आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला होतात.
तीन महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय
गेल्या महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि dearness relief (DR) मध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर तो 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढ लागू करून तीन महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. अशा स्थितीत एप्रिलचा पगार 1 मे रोजी येणे अपेक्षित आहे.
45 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार
एप्रिलचा पगार वाढीव डीए आणि तीन महिन्यांच्या थकबाकीसह (जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च) येईल. यामध्ये 45 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.
वाढलेल्या डीएचे गणित?
34 टक्के महागाई भत्त्यामुळे, 18 हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 6,120 रुपये डीए मिळेल. सध्या त्यांना 31% दराने 5,580 रुपये मिळतात. म्हणजेच दर महिन्याला पगारात 540 रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्याच्या पगारासह 3 महिन्यांची डीएची थकबाकी येईल. अशा परिस्थितीत मार्च महिन्याचा पगार 2,160 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
तर ज्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, त्यांचा डीए 19,346 रुपये असेल. पूर्वी ते 31 टक्क्यांच्या तुलनेत 17,639 रुपये होते. म्हणजेच दर महिन्याला पगारात 1,707 रुपयांची वाढ झाली. अशा परिस्थितीत मार्चच्या तुलनेत यावेळी 6828 रुपये अधिक येण्याची शक्यता आहे.