केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; सणाच्या आधीच सरकारकडून मिळणार बंपर गिफ्ट

7 th Pay Commission | दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर गिफ्ट

Updated: Oct 16, 2021, 08:40 AM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; सणाच्या आधीच सरकारकडून मिळणार बंपर गिफ्ट title=

 

मुंबई : दिवाळी (Diwali)च्या आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 3 मोठे गिफ्ट मिळू शकते. पहिले  महागाई भत्ता वाढ (DA),दुसरे DA एरियरवर सरकार घेणार निर्णय, तिसरे म्हणजे प्रोविडंट फंडचे व्याज दिवाळीआधी जमा होणार. (7th pay commission)

पुन्हा वाढू शकतो DA
जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता अद्याप ठरलेला नाही. परंतु जानेवारी ते मे 2021 चे ऑल इंडिया कंज्युमर प्राइज इंडेक्स (AICPI)च्या आकड्यांवरून कळते की, यामध्ये 3 टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते. केंद्र सरकार दिवाळीच्या आसापास DA वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते.

डीए एरियरवर चर्चेचा निर्णय
18 महिन्यांपासून पेडिंग एरियरचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचला आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा आहे की, दिवाळीच्या आधी महागाई भत्ता त्यांना मिळू शकतो. अर्थ मंत्रालयाने कोविड 19 महामारीमुळे मे 2020 मध्ये DAमध्ये होणारी वाढ 30 जून 2021 पर्यंत थांबवण्यात आली होती.

PF च्या व्याजावरील पैसे
कर्मचारी भविष्य निधी संघटन(EPFO)चे 6 कोटीहून अधिक अकाउंट होल्डर्सला दिवाळीच्या आधी खुशखबरी मिळू शकते.पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाचे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. ईपीएफओ लवकरच आपल्या ग्राहकांच्या खात्यात 2020-21 साठी व्याज ट्रान्सफर करण्याची घोषणा करू शकते.