7th pay commission: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यासोबत अप्रेजलमुळे पगार वाढणार

CSS, CSSS आणि CSCS या संवर्गातील गट ए, बी आणि सी या अधिकाऱ्यांच्या अप्रेजलचे काम सरकारने सुरू केले आहे.

Updated: Jun 3, 2021, 08:29 PM IST
7th pay commission: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यासोबत अप्रेजलमुळे पगार वाढणार title=

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. कारण त्यांचा पगार वाढण्याची माहिती मिळाली आहे. पगारवाढी बरोबरच पदोन्नती म्हणजेच त्यांचे प्रमोशन होणार आहे. अप्रेजल केल्यावर केंद्रीय कर्मचार्‍यांचे प्रमोशन होईल. यासाठी कर्मचार्‍यांना सेल्फ असेसमेंट फॉर्म भरावा लागेल आणि तो फॉर्म अहवाल अधिकाऱ्याला द्यावा लागेल. अहवाल देणारे अधिकारी कर्मचार्‍यांना रेटिंग देतील त्यानंतर त्यांचे अप्रेजल होईल आणि पगार वाढवला जाईल.

अप्रेजलचे काम एनुअल परफॉर्मेंस असेसमेंट रिपोर्ट (APAR) अंतर्गत केले जाईल. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विचार करता सरकारने हा कालावधी वाढवला असला तरी, हे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल. यानंतर अप्रेजलचे काम पुढे होणार नाही.

CSS, CSSS आणि CSCS या संवर्गातील गट ए, बी आणि सी या अधिकाऱ्यांच्या अप्रेजलचे काम सरकारने सुरू केले आहे. 2020-21 मध्ये SPARROW पोर्टल अंतर्गत अप्रेजलचे काम केले जाणार आहे.\

SPARROW पोर्टलवर अप्रेजल

मे महिन्यात डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एँड ट्रेनिंग (DoPT)चे अधिकृत निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे की, कोव्हिड -19  च्या दृष्टिकोनातून APAR प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. APAR अंतर्गत वितरण, ऑनलाइन निर्मिती, रेकॉर्डिंग आणि अप्रेजलपूर्ण करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे. ही सूचना गट ए, बी आणि सी या अधिकार्‍यांना लागू आहे.

सेल्फ असेसमेंट अप्रेजल

कोणताही अहवाल देणारा किंवा आढावा घेणारा अधिकारी आपल्या कमेंट्स किंवा  रिमार्क्स रिकॉर्ड नोंदविण्यास अपयशी ठरल्यास, अप्रेजल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण रेकॉर्डच्या आधारे अप्रेजल करेल.

अहवाल अधिकार्‍यांना स्वत: चे अप्रेजल रिपोर्ट सादर करण्याची तारीख 30 जून 2021 निश्चित केली आहे. रिपोर्टिंग ऑफिसरला आपला अहवाल 31 जुलैपर्यंत रिव्यूइंग अधिकाऱ्याकडे पाठवावा लागेल. आढावा घेणार्‍या रिव्यूइंग अधिका्यास 31ऑगस्टपर्यंत अप्रेजल अहवाल APAR सेलकडे पाठवावा लागेल.

APAR सेलला 10 सप्टेंबर 2021 पर्यंतयाचा डिस्क्लोजर करावा लागणार. APAR संदर्भात कोणतेही रिप्रेजेंटेशन आवश्यक असल्यास, ते डिस्क्लोज होण्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत करावे लागेल.

यानंतर, काँपीटेंट अथॉरिटीला 30 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांचे रिप्रेजेंटेशन पाठवावे लागेल. हे काम काँपीटेंट अधिकार्‍याने ज्या महिन्यात रिप्रेजेंटेशन केले आहे, त्या महिन्यात पूर्ण करावे लागेल. काँपीटेंट अथॉरिचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना APAR सेलला अहवालाची संपूर्ण माहिती 15 दिवसात द्यावी लागेल.  APAR प्रक्रिया 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केली जाईल.

अप्रेजलपूर्वी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. जुलै महिन्यात सरकार याला लागू करणार आहे. ते तीन हप्त्यात दिले जाईल. यात जानेवारी 2020, जून 2020 आणि जानेवारी 2021 चा भत्ता समाविष्ट केलेला असेल.

सध्या कर्मचार्‍यांना 17 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. असा अंदाज आहे की, जून 2021 चा भत्ताही वाढेल, जो डिसेंबरपर्यंत भरला जाऊ शकतो. यानंतर अप्रेजलमुळे वेतनह वाढेल. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता वाढणार आहे.