New Wage Code : पगारापासून ते PF पर्यंत होणार महत्वाचे बदल, सरकारचे नवे नियम लागू

कर्मचाऱ्यांच्या भविष्याकरता सरकारचा मोठा निर्णय 

Updated: Aug 30, 2021, 07:28 AM IST
New Wage Code : पगारापासून ते PF पर्यंत होणार महत्वाचे बदल, सरकारचे नवे नियम लागू title=

मुंबई : केंद्र सरकारने वेज कोड बिलाची (New Wage Code) तयारी पूर्ण झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत हे नवं बिल लागू करण्यात येणार आहे. या बिलाला 1 एप्रिल रोजी लागू करणार होते. मात्र राज्य सरकारकडून ड्राफ्ट रूल्स न मिळाल्यामुळे हे नियम लागू करण्यात आले नाहीत. या नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांची सुट्टी, सॅलरी आणि काम करण्याच्या तासांमध्ये अनेक बदल केले गेले आहे. नव्या बिलासह कर्मचाऱ्यांना अनेक आनंदाच्या गोष्टी मिळणार आहे. 

कामाचे तासही वाढणार आणि सुट्टीही 

नवीन वेज कोड  (New Wage Code Working Hours) च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार आहेत. 9 तासावरून हे कामाची वेळ 12 तास करण्यात आली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानुसार, आठवड्यात 48 तास काम करणं महत्वाचं ठरणार आहे. काही युनियन 12 तास काम करण्यावर आणि 3 दिवस सुट्टीवर प्रश्न उभे करत आहेत. 

सरकारने म्हटल्याप्रमाणे, आठवड्याचे 48 कामाचे तास भरणे हा नियम असेल. जर कुणी दिवसाला फक्त 8 तास काम करत असेल. तर त्याला आठवड्यातून 6 दिवस भरणे गरजेचे आहे. त्यांना फक्त एकच दिवस सुट्टी मिळणार आहे. जर कुणी एका दिवशी 12 तास भरत असेल तर त्याला 3 दिवस सुट्टी मिळणार आहे.  

नवीन वेज कोडमध्ये अनेक गोष्टी खास 

नवीन वेज कोड (New Wage Code Benefits) मध्ये अनेक बदल करण्यात आले. याचा प्रभाव ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सॅलरीड क्लास, मिल आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांपर्यंत साऱ्यांवरच परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ते त्यांच्या सुट्ट्यांपर्यंत आणि कामाच्या तासांपर्यंत सगळ्यातच बदल होणार आहेत. सामान्यांच्या जीवनावर याचा सकारात्मक बदल होणार आहे. 

सॅलरी स्ट्रक्चरमध्ये होणार बदल 

नवीन कोज कोडच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये (New Wage Code Salary Structure) बदल केले जाणार आहेत. Take Home Salary मध्ये कपात केली जाणार आहे. कारण वेज कोड ऍक्ट  (Wage Code Act), 2019 च्या नुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी  (Cost To Company-CTC) ही 50 टक्के पेक्षा कमी असू शकत नाही. अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी देऊन त्यावर भत्ता अधिक दिला जातो. 

वर्षांच्या सुट्टीत होणार वाढ 

कर्मचाऱ्यांची Earned Leave सुट्य़ांमध्ये वाढ झाली आहे. 240 वरून 300 पर्यंत या सुट्ट्या करण्यात आल्या आहेत. लेबर कोड (New Wage Code Leave) च्या नियमांमध्ये देखील बदल केले आहेत. श्रम मंत्रालय, लेबर युनियन आणि उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये वेगवेगळ्या बाबतीत चर्चा झाली आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची Earned Leave 240 वरून 300 पर्यंत झाली आहे. 

वर्कर्सकरता मिनिमम वेज लागू 

पहिल्यांदाच देशातील सर्व प्रकारच्या कामगारांना मिनिमम वेतन म्हणजेच किमान वेतन मिळेल. स्थलांतरित मजुरांसाठी नवीन योजना आणल्या जात आहेत. याशिवाय सर्व कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी भविष्य निर्वाह निधीची सुविधा दिली जाईल. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनाही ईएसआयचे संरक्षण मिळेल. याअंतर्गत महिलांना सर्व प्रकारच्या व्यवसायात काम करण्याची परवानगी दिली जाईल, त्यांना रात्रीच्या शिफ्ट करण्याचीही परवानगी असेल.

PF आणि ग्रॅच्युटी वाढणार 

या अंतर्गत मूलभूत वेतन वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ अधिक कापला जाईल, म्हणजेच तुमचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असेल. पीएफ सोबतच ग्रॅच्युइटी मध्ये योगदान देखील वाढेल.  म्हणजेच, टेक होम पगार नक्कीच कमी होईल परंतु कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर अधिक रक्कम मिळेल. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही नवीन वेतन संहिता लागू होईल. वेतन आणि बोनस संबंधित नियम बदलतील आणि प्रत्येक उद्योग आणि क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये समानता असेल.