7th pay commission: UPSCमध्ये या पदांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज

असा करा अर्ज...

Updated: Jan 27, 2020, 12:26 PM IST
7th pay commission: UPSCमध्ये या पदांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज
फाईल फोटो

मुंबई : संघ लोक सेवा आयोगने (Union Public Service Commission - UPSC) असिस्टंट इंजिनियर (UPSC Assistant Engineer Recruitment 2020), मेडिकल ऑफिसर (आयु्र्वेद), एंथ्रॉपोलोजिस्ट आणि इतर काही पदांसाठी सरकारी नोकरीत भरती सुरु करण्यात आली आहे. यात सातव्या वेतन आगोयाच्या शिफारसीनुसार, पगार आणि इतर सुविधा मिळणार आहेत. या नोकरीसाठी आवश्यक ती योग्यता आणि आवड असल्यास या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.

या भरतीसाठी -

पद - असिस्टंट इंजिनियर, मेडिकल ऑफिसर (आयु्र्वेद), एंथ्रॉपोलोजिस्ट आणि इतर रिक्त पदांची संख्या - १३४

योग्यता - ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीबीएस

पगार - लेव्हल ७, १०, १२

वयोमर्यादा - जास्तीत ४५ वर्ष 

परिक्षा फी -

ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गातील लोकांना ऑनलाईन अर्ज करताना २५ रुपये भरावे लागणार आहेत. फी पेमेंट करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, एसबीआयच्या कोणत्याही शाखेत चालानद्वारे करता येऊ शकतं. याशिवाय एससी, एसटी, पीएच आणि कोणत्याही महिला उमेदवाराला परिक्षा फी भरावी लागणार नाही. 

ऑनलाईन अर्ज करण्याची तारिख - २५ जानेवारी २०२० 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख - १३ फेब्रुवारी २०२०

येथे करा ऑनलाईन अर्ज 

उमेदवाराची निवड मुलाखतीच्याआधारे करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन www.upsconline.nic.in अधिक माहिती घेता येऊ शकते.