8 वर्षाच्या भारतीय मुलाची सर्वात उंच पर्वतावर चढाई

समन्यूला मोठेपणी एअर फोर्स ऑफिसर बनायचे आहे. 

Updated: Dec 23, 2018, 03:58 PM IST
8 वर्षाच्या भारतीय मुलाची सर्वात उंच पर्वतावर चढाई  title=

नवी दिल्ली : हैदराबादच्या 8 वर्षाच्या मुलाचं सध्या जगभरातून कौतूक होतंय.  ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत असलेल्या Mount Kosciuszko ची चढाई केल्यानंतर हा मुलगा चर्चेचा विषय बनलाय. 12 डिसेंबरला आई लावण्या आणि बहिण सहित 5 जणांना घेऊन त्याने हा कारनामा केलाय. एएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.   याआधी समन्यू पोठुराजूने आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वतावर चढाई केली होती. आपण आतापर्यंत 4 उंच पर्वत चढलो असल्याचे समन्यू याने सांगितले. यासोबतच त्याने आपले भविष्यातील प्लानिंग देखील सांगितले. जापानच्या माऊंट फुजीची चढाई करण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासोबतच समन्यूला मोठेपणी एअर फोर्स ऑफिसर बनायचे आहे. 

आईकडून प्रेरणा 

हॅंडलूमची जाहिरात करण्यासाठी समन्यूसोबत पर्वत चढणाऱ्या टीमने तेलंगणा हॅंडलूमचा पेहराव केला होता. प्रत्येकवेळी आमची टीम एक उद्दीष्ट समोर ठेवून तसे प्लानिंग करत असल्याचे समन्यूच्या आईने सांगितले. याआधी समन्यूने आई आमि कोच सहित इतर जणांच्या टीमला घेऊन तंजानियाच्या माऊंट किलिमान्जरोतील उहुरूची चढाई केली होती. 2 एप्रिल 2018 ला त्याने समुद्र तळापासून 5 हजार 895 मीटर उंचीवर तिरंगा फडकवला होता. आई लवन्या आणि कोच थाम्मिनेनी भारथ यांच्यापासून त्याला सर्वाधिक प्रेरणा मिळत असल्याचे समन्यू सांगतो. 
 
माऊंट किलिमान्जरोची चढाई करत त्याने समन्यूने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. याआधी कमी वयात माऊंट किलिमान्जरोवर चढाई करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या मोन्टन्ना केने याच्या नावावर आहे. पण समन्यू याने त्याच्यापेक्षाही 3 दिवस कमी वेळ घेत ही चढाई केली आहे.