धक्कादायक! वडिलांनी परदेशातून आणलेल्या चॉकलेटनं घेतला 8 वर्षीय मुलाचा जीव

चॉकेलट खाल्ल्यामुळे 8 वर्षीय चिमुकल्याचं निधन... काय आहे पूर्ण प्रकरण?  

Updated: Nov 28, 2022, 02:09 PM IST
धक्कादायक! वडिलांनी परदेशातून आणलेल्या चॉकलेटनं घेतला 8 वर्षीय मुलाचा जीव title=

Child Died after ate chocolate : चॉकलेट फक्त लहान मुलांनाच नाही तर, मोठ्या व्यक्तींना देखील आवडतात. पण याठिकाणी चिमुकल्याला चॉकलेट खाणं महागात पडलं आहे. वडिलांनी परदेशातून आणलेले चॉकलेट (chocolate) खाल्ल्यामुळे 8 वर्षीय चिमुकल्याचं निधन झालं आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणा येथील आहे. तेलंगणात चॉकलेटमुळे चिमुकल्याचा जीव गेल्यामुळे पूर्ण देशात खळबळ माजली आहे. (8 years old Child Died after ate chocolate)

काय आहे पूर्ण घटना?

चॉकलेट खाल्ल्याने निधन झालेल्या 8 वर्षीय मुलाचं नाव संदीप सिंग (Sandeep Singh) असं आहे. चॉकलेट खात असताना एक तुकडा गळ्यात अडकल्यामुळे चिमुकल्याचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक प्रयत्न करुन देखीस संदीपच्या गळ्यात अडकेला चॉकलेटचा तुकडा काढता आलेला नाही. अखेर कुटुंबाने संदीपला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. 

चिमुकल्याच्या गळ्यात अडकलं 5 रुपयांचं नाणं
तेलंगणामध्ये जशी घटना घडली आहे, तशी उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली. किशोर चौधरी यांच्या 4 वर्षीय मुलाच्या अन्ननलीकेत 5 रुपयांचं नाणं अडकलं होतं. 4 वर्षीय मुलाने खेळताना 5 (5 rs) रुपयांचं नाणं गिळलं होतं. ज्यामुळे त्याला घशात दुखत होतं शिवाय  अन्न गिळण्यास त्रास होत होता. 

त्यामुळे कुटुंबाने (family) मुलाला रुग्णालयात दाखल केलं. अखेर एक्स-रे काढल्यानंतर घशात नाणं अडकल्याचं समोर आलं. कुटुंबीयांनी बाळाला घेऊन मध्य प्रदेशातील सतना जिल्हा रुग्णालय गाठलं. याठिकाणी बालरोग तज्ज्ञांनी (Pediatric specialists) मुलाच्या गळ्यात अडकलेलं नाणे काढून कुटुंबाला मोठा दिलासा दिला.