Viral News: 19 वर्षीय मुलगा रशियन तरुणीला लग्न करुन घरी घेऊन आला, आईची अशी होती प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओ तरुण मुलगा एका रशियन मुलीला लग्न करुन आपल्या घरी आणतो. त्याने तरुणीच्या भांगेत कुंकू भरलेलं असून, गळ्यात हार हातलेला असतो. हे सर्व पाहिल्यानंतर मुलाची आई प्रचंड चिडते. पण सत्य समोर येतं तेव्हा तिलाही धक्का बसतो.  

Updated: Mar 22, 2023, 05:13 PM IST
Viral News: 19 वर्षीय मुलगा रशियन तरुणीला लग्न करुन घरी घेऊन आला, आईची अशी होती प्रतिक्रिया; VIDEO व्हायरल

Viral News: तुमचा मुलगा अचानक लग्न करुन घरी पोहोचला तर काय होईल? नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक 19 वर्षीय तरुण रशिया मुलीशी लग्न करुन तिला घऱी येऊन येतो. मुलाने आपल्याला काहीच कल्पना न देता लग्न केल्याने त्याची आई चांगलीच चिडते. पण नंतर जेव्हा त्यांना सत्य कळतं तेव्हा मोठा धक्का बसतो. हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून, व्हायरल झाला आहे. 

खरं तर मुलाने आपल्या आईसोबत केलेला हा प्रँक होता. युट्यूबर अनमोल वर्मा आपली मैत्रीण इवा आणि एका रशियन तरुणीसोबत दिसत आहे. अनमोलने आपल्या घरातही एक कॅमेरा सेट केला होता. आपल्या आईला फसवण्यासाठी अनमोलने रशियन तरुणीच्या भांगेत कुंकू भरलं तसंच गळ्यात हार घातले होते. आईला हे लग्न खरं वाटावं यासाठी त्याने सगळी काळजी घेतली होती. 

यानंतर अनमोल घरी पोहोचला आणि आईला लग्न केल्याचं सांगितलं. मी लग्न केलं असून अलोना आता इथेच राहणार आहे असं तो आईला सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याची आई चिडते आणि तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अशी विचारणा करते. आई त्याला कॅमेरा बंद करत घरात येण्यास सांगते. बाहेर तमाशा करण्याची गरज नाही. घरात येऊन बोलू असं त्याची आई अनमोलला सांगते. 

अनमोलच्या आईला यावेळी हा प्रँक असल्याचीही शंका येते. यावर अनमोल इवाला कोर्ट मॅरेज केल्याचं सर्टिफिकेट दाखवण्यास सांगतो. आपण लग्न झाल्याची सगळी कागदपत्रं दाखवू शकतो असं अनमोल आईला सांगतो. पण आईला मात्र हा प्रँक असल्याची शंका वारंवार येत असते. यावेळी अनमोलची मैत्रीण इवा दोघांनी लग्न केलं असून, आपणच साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली असल्याचं सांगते. 

अनमोलची आई यावेळी अलोनालाही हा प्रँक असल्याचं सांगते. नंतर त्याला दरडावत स्वत:ची जबाबदारी घेता येते का अशी विचारणाही करते. यावेळी त्या अलोनालही तू तुझ्या घरच्यांना सांगितलं नाही का? असं विचारतात. 

व्हिडीओच्या शेवटी अनमोल आईला हा प्रँक असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याची आई त्याला फटके देण्यास सुरुवात करते. यावर अलोना आणि इवाही जोरजोरात हसू लागतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.