43 वर्षीय टॅक्सी चालकाला लुटलं, मारलं, नंतर रस्त्यावर फरफटत नेलं; हादरवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

राजधानी दिल्लीमधील कंझावाला येथे अंजलीच्या हत्येनंतर आता आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. दिल्लीतील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या वसंत कुंज येथे एका टॅक्सी ड्रायव्हरला तब्बल 200 मीटरपर्यंत कारने फरफटत नेण्यात आलं. यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाला.   

शिवराज यादव | Updated: Oct 11, 2023, 01:35 PM IST
43 वर्षीय टॅक्सी चालकाला लुटलं, मारलं, नंतर रस्त्यावर फरफटत नेलं; हादरवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

दिल्लीमधील वसंत कुंज येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीला धावत्या कारसह तब्बल 200 मीटपर्यंत फरफटत नेत ठार करण्यात आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. रात्री 11.30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पीडित टॅक्सी चालक गंभीर अवस्थेत त्यांना आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बिजेंद्र असं या पीडित व्यक्तीचं नाव असून, ते फरिदाबादचा रहिवासी आहेत. 

पोलीस तपासात माहिती मिळाली की, टॅक्सी ड्रायव्हरला आरोपी लुटत होते. यावेळी चालकाने विरोध केला असता आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. यानंतर हल्लेखोरांनी जवळपास 200 मीटरपर्यंत बिजेंद्र यांना फरफटत नेलं. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती कारसह रस्त्यावर फरफटत जात असल्याचं दिसत आहे. यावेळी रस्त्यावर इतर वाहनंही धावताना दिसत आहेत. ही व्यक्ती कारच्या खालील भागात अडकली होती. पण आरोपींनी कार थांबवली नाही. नंबरवरुन ही कार हरियाणाची दिसत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x