प्रसिद्ध अभिनेत्रीचा Air India Flight मध्ये छळ, मद्यधुंद सहप्रवाशाने...

Divya Prabha : प्रसिद्ध अभिनेत्रीचा तिच्या सहप्रवाशाने छळ केल्याची घटना समोर आली आहे. त्या सहप्रवाशाने नशेत...

Updated: Oct 11, 2023, 01:47 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचा Air India Flight मध्ये छळ, मद्यधुंद सहप्रवाशाने... title=
actress divya prabha alleges harassment o AIR INDIA FLIGHT by drunk co passenger

Divya Prabha :  Air India Flight मध्ये परत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वी मद्यप्राशन केलेल्या सहप्रवाशाकडून गैर वर्तन झाल्याची घटना उघड झाली आहे. यावेळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभासोबत Air India Flight मध्ये सहप्रवाशाने छळ केला आहे. या घटनेची माहिती सोशल मीडियावर खुद्द अभिनेत्रीने सांगितलं आहे. (actress divya prabha alleges harassment o AIR INDIA FLIGHT by drunk co passenger)

मुंबई कोची एअर इंडिया फ्लाइट एआय 681 मध्ये ही घटना घडली आहे. 9 ऑक्टोबरला हा प्रकार घडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaison Madany photography (@jaisonmadany)

अभिनेत्री एअर होस्टेलला मदतीसाठी बोलवण्यानंतर तिला फक्त दुसऱ्या जागेवर बसविण्यात आले. त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाह, असंही अभिनेत्रीने सांगितलं.

त्यानंतर विमानतळ पोलीस मदत चौकीत अभिनेत्रीला नेण्यात आलं. तिथे अभिनेत्रीने रितसर सहप्रवाशाने केलेल्या छळाबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यांनी अभिनेत्रीची तक्रार नोंदवून घेतली आहे. 

दिव्याने सांगितलं की, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मी 12A सीटवर बसली होती. तर एक प्रवासी नशेत धुंद 12C या सीटवर बसला होता. काही वेळानंतर तो माझ्या शेजारच्या 12B येऊन बसला. थोड्या वेळाने त्याने उगाचच भांडण करायला घेतलं. त्याने आधी बसण्याच्या जागेवरुन वाद घातला. शाब्दिक वादावादीत त्याने शारीरिक गैरवर्तण केलं. पण मी जेव्हा या प्रवाशाची तक्रार केल्यावर मला फक्त दुसऱ्या ठिकाणी बसविण्यात आले. विमान स्टाफने त्या प्रवाशावर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, अशी तक्रारही अभिनेत्रीने केली आहे.